मनोरंजनमुंबई

Photos : ‘दंगल’ फेम सान्या मल्होत्राचे ‘हे’ फोटो सोशल मीडियावर चर्चेत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्ट्रेस सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) कायमच सोशलवर सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती कायमच चाहत्यांसोबत शेअर करत असते. अनेकदा तिनं आपला बोल्ड आणि ग्लॅमरस लुकही चाहत्यांना दाखवला आहे. आपल्या काही फोटोंमुळं ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

सान्यानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात तिचा बोल्ड अवतार दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं वेगवेगळ्या फोटोत वेगळा लुक केला आहे. काही फोटोत तिनं शॉर्ट ड्रेस घातला आहे. ज्यात ती तिचे सेक्सी लेग्स फ्लाँट करताना दिसत आहे.

सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांनीही तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. काहींनी हे फोटो शेअरही केले आहेत. अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुकही केलं आहे. अनेक चाहत्यांना तिचा लुक आवडला आहे.

सान्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं आमिर खानच्या दंगल सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. या सिनेमात तिनं कुस्तीपटू बबीता कुमारची भूमिका साकारली होती.

 

Back to top button