Sapna Chaudhary | अभिनेत्री सपना चौधरी विरुद्ध अटक वाॅरंट; ‘या’ प्रकरणात गुंतलीय देशी क्वीन

लखनऊ – पोलीसनामा ऑनलाइन टीम –  Sapna Chaudhary | न्यायालयाने बुधवारी डांसर तसेच अभिनेत्री सपना चौधरी (Sapna Chaudhary) विरुद्ध अटक वॉरंट जारी केला आहे. सपना चौधरी वर कार्यक्रमाला हजर न राहण्याचा आणि प्रेक्षकांचे पैसे परत न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शंतनु त्यागी यांनी सपना विरूद्ध अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केलं असून पुढील सुनावणीसाठी तिला न्यायालयात हजर करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

सपना चौधरीवरील (Sapna Chaudhary) आरोप न्यायालयाला निश्चित करायचे असल्याने सपनाने न्यायालयात (Court) हजर राहणे अत्यंत गरजेचे आहे. या प्रकरणी तिच्याविरुद्ध तक्रार नोंदवल्यानंतर सपना चौधरीने तक्रार फेटाळणीचा अर्ज केला होता. मात्र न्यायालयाकडून तो फेटाळण्यात आला आहे.

 

 

14 ऑक्टोंबर 2018 रोजी पोलीस ठाण्यामध्ये सपना चौधरी विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली होती. तर 13 ऑक्टोबर रोजी लखनऊच्या (Lucknow) स्मृती उपवन मध्ये दुपारी तीन ते दहा या वेळेत सपनाचा कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला होता.

सपना चौधरी व्यतिरिक्त कार्यक्रमाचे आयोजक जुनेद अहमद, नवीन शर्मा आणि अमित पांडे आणि रत्नाकर उपाध्याय आहेत. प्रेक्षकांनी 300 रुपये देऊन तिकीट (Tickets) खरेदी केल्याची माहिती न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सपना चौधरीचा शो पाहण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते. मात्र सपना चौधरी रात्री दहा वाजेपर्यंत न आल्याने (Absent) प्रेक्षकांनी गोंधळ घातला.

 

 

Web Title :- Sapna Chaudhary | arrest warrant issued against sapna chaudhary desi queen entangled in this matter

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Rains | राज्यात आगामी 4 दिवस पाऊस ‘कोसळणार’ – IMD

Nawab Malik | बनावट नोटांवरून नवाब मलिकांचा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर नवीन आरोप, म्हणाले…

Gujarat ATS | गुजरातमध्ये पुन्हा ड्रग्जचा मोठा साठा जप्त, ATS कडून 120 कोटींचा माल ताब्यात

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राची भेट ! 18 महिन्यांपासून रखडलेल्या DA थकबाकीबाबत मोठं अपडेट आलं समोर