home page top 1

सपना चौधरीची एक झलक पाहण्यासाठी चाहते बेभान ; एकाचा मृत्यू

पटना | वृत्तसंस्था : बिहारच्या बेगुराय भागात डान्सर सपना चौधरी हिच्या लाईव्ह शो चे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला गालबोट लागले. सपना चौधरीचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्याकरिता प्रेक्षाकांनी तुंबळ गर्दी केली होती. गुरुरवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जोरदार धिंगाणा झाला. प्रेक्षकांनी अक्षरश: एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या. शेवटी गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या कार्यक्रमादरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.
दरम्यान, या कार्यक्रमात सुदेश भोसले व हंसराज हंस यांच्यासह सपना या कार्यक्रमासाठी पोहोचली होती. मध्यरात्री १२ च्या सुमारास सपना स्टेजवर पोहोचली आणि गर्दीचा संयम सुटला.
कार्यक्रमादरम्यान नक्की काय झाले 

सपना चौधरीच्या कार्यक्रमाकरिता लोक गर्दी खेचायचे पण जेव्हापासून तीने  बिग बॉस या रिऍलिटी शो मध्ये सहभाग घेतला होता तेव्हापासून तिची लोकप्रियता आणखीनच वाढली आहे. दरम्यान गुरुवारच्या कार्यक्रमादरम्यान  सपनाला जवळून पाहण्यासाठी लोक स्टेजकडे धावत सुटले. यादरम्यान लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकणे सुरू केले. या कार्यक्रमासाठी ५० हजारांवर लोक पोहोचले होते. या गोंधळात सपनाने २ गाणी सादर केली. पण गर्दी अनियंत्रित झाल्याने आयोजकांना कार्यक्रम मध्येच थांबवावा लागला. गर्दी जुमानत नाहीये, हे पाहून पोलिसांना लाठीमार करावा लागला.

लिव्ह-इन मध्ये राहणाऱ्या महिलेला सुरक्षाकवच ; मिळणार ‘हा’ अधिकार

कार्यक्रमादरम्यान झालेली चेंगराचेगरी आणि लाठीमारात डझनावर लोक जखमी झालेत तर एका व्यक्तिचा मृत्यू झाला. मृताचे नाव साजन कुमार असल्याचे कळते. तो बडिया येथे राहणारा आहे.
सपनाची झलक पाहण्यासाठी लोकांची तुंबळ गर्दी  
सपनाची एक झलक पाहाण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात. अनेक वेळा तर तिच्या कार्यक्रमाला लोकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागतो. कोणताही स्टेज शो म्हटला की, एक संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. पण सपनाच्या कार्यक्रमात ती एकटीच अनेक तास लोकांचे मनोरंजन करते आणि विशेष म्हणजे ती कायम पंजाबी ड्रेसमध्येच परफॉर्म करते.
Loading...
You might also like