कोण आहेत केजरीवाल ? स्टार डान्सर सपना चौधरी म्हणाली – ‘मी कोणत्या केजरीवालांना नाही ओळखत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हरियाणवी डान्सर आणि सिंगर सपना चौधरीनं दिल्लीच्या पालम भागात भाजप उमेदवाराचा प्रचार केला. यावेळी सपना एका वृत्तवाहिनी संवाद साधला. यावेळी बोलताना कोण आहे केजरीवाल ? असं सपना म्हणाली. इतकंच नाही तर ती कोणत्याही केजरीवालला ओळखत नाही असंही ती म्हणाली.

वृत्तवाहिनीशी बोलताना अरविंद केजरीवालांकडून मनोज तिवारींच्या होणाऱ्या सततच्या अपमानावर बोलताना सपना म्हणाली, “कोण आहे हे केजरीवाल ? मी कोणत्याही अरविंद केजरीवालांना ओळखत नाही.”

‘मोफत गोष्टी देऊन लोकांची दिशाभूल करणं बंद करा’
केजरीवाल सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या मोफतच्या योजनांबद्दल बोलताना सपना म्हणाली, “फ्री च्या गोष्टी जास्त दिवस नाहीत चालत. दिल्ली सरकारला माझं अपील आहे की, मोफत गोष्टी देऊन लोकांनी दिशाभूल करणं त्यांनी बंद करावं.

राजकारणात केव्हा येणार ?
निवडणूक लढवण्याच्या बातम्यांवर बोलताना सपना म्हणाली, “मी माझ्या करिअरमध्ये खुश आहे. मी सत्याची बाजू घेत असते.” निवडणुकीच्या मैदानात ती काँग्रेसला कुठे पाहते असं विचारल्यानंतर सपना म्हणाली, “ज्या गोष्टी मैदानातच नाहीत त्या पाहणं मला आवडत नाहीत.”

आंदोलनांचा निवडणुकींवर परिणाम होणार नाही
शाहीन बागमधील आंदोलन आणि CAAच्या मुद्द्यावर बोलताना सपना म्हणाली, “मला नाही वाटत की सीएए किंवा शाहीन बागमधील आंदोलनाचा निवडणुकीवर काही परिणाम होईल. कारण चुकीचं आणि बरोबर सर्वांनाच कळतं. दिल्लीत लोक जास्त शिक्षित आहेत. निश्चितपणे दिल्लीत कमळ येणार आहे. माझी अशी इच्छा आहे की दिल्लीत जेव्हा भाजपचं सरकार स्थापन केलं जाईल तेव्हा मनोज तिवारी दिल्लीचे मुख्यमंत्री व्हावेत.”