‘स्टार डान्सर’ सपना चौधरीच्या ‘टल्ली’चा सोशलवर ‘धुमाकूळ’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री, सिंगर आणि स्टार डान्सर सपना चौधरी जेव्हा कधी स्टेजवर येते तेव्हा आपल्या ठुमक्यांनी आग लावत असते. सपना जेवढी फेमस लोकांमध्ये असते तेवढीच ती सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टीव असते. सपनाने आपल्याच एका डान्स व्हिडीओचे रिमिक्स व्हर्जन इंस्टाग्रामवरून शेअर केले आहे. हट जा ताऊ असं या गाण्याचं नाव आहे. काही तासांचत या व्हिडीओला लाखो व्ह्युज मिळाले आहे. सध्या सपनाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

सपनाने आपला हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “डान्स करताना असा करा जसं कोणी पहातच नाहीये. मी डान्स करताना कधीच थकत नाही कारण डान्स माझी पॅशन आहे.” सपना सोशलवर नेहमीच आपले फोटो आणि डान्स कार्यक्रमाचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

डान्स आणि अ‍ॅक्टींगनंतर आता सपना चौधरीने आपल्या सिंगिंग डेब्यूनेही चाहत्यांना भुरळ घातली आहे. सपना चौधरी आणि दलेर मेहंदी यांच्या आवाजात आलेलं गाणं बावली तरेड युट्युबवर खूप गाजताना दिसत आहे. दोन महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या या गाण्याला यु्ट्युबवर 2 मिलियन्सहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. यानंतर सपना चैधरीने ईदच्या मुहूर्तावर आपलं दुसरं गाणं नचके दिखा रिलीज केलं होतं. या गाण्यात सपना सोबत सिंगर वसीम शेख दिसला होता.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like