#VideoViral : ‘ही’ लहानगी मुलगी देत आहे सपना चौधरीला टक्कर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हरियाणवी डान्सर सपना चौधरी अनेकदा चर्चेत असते. तिचा डान्स अनेकांना थिरकायला मजबूर करतो. डान्स करतानाचा सपनाचा झळकणारा बिंधास्तपणाही अनेकांना आवडतो. तिच्या अदांचे लाखो दीवाने आहेत. सपना इतका ठुमकेदार डान्स करते की, तिला नाचताना पाहून अनेकांचा पाय थिरकायला लागतो.

सपनाची फॅनफॉलोविंग ही एखाद्या सुपरस्टारपेक्षा नक्कीच कमी नाही. पुन्हा एकाद सपना चौधरी चर्चेत आल्याचं दिसत आहे. सपनाचा डान्सचा व्हिडीओ सोशलवर सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत सपना एका लहान मुलीसोबत डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, ही लहानगी सपनाला काट्याची टक्कर देताना दिसत आहे. मुख्य म्हणजे सपना सोबत नाचताना जी मुलगी दिसत आहे ती सपनाची खूप मोठी फॅन आहे. सपना सोबत डान्स करताना ही लहानगी सपनाच्या स्टेप हुबेहूब कॉपी करताना दिसत आहे.

https://youtu.be/SIf9Q2ep0K4

या व्हिडीओत सपनाचे गाजलेले गाणे तेरी आख्या का यो काजल या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. अनेका ठिकाणी सपना चौधरीचे शो हिट ठरत आहेत. हरियाणा ते युपी, बिहार पर्यंत सपना चौधरी हे नाव पोहोचले आहे.