मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही – सपना चौधरी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – सपना चौधरी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्या मथुरा मतदारसंघातून भाजपाच्या विद्यमान खासदार हेमामालिनी यांच्या विरोधात निवडणुक लढवणार आहेत. अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. तसंच सपना चौधरी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे एकत्रित छायाचित्रही प्रसिद्ध झाले. त्यावर सपना चौधरीने पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे.

 

मी काँग्रेसमध्ये सहभागी झालेली नाही आणि भविष्यातही कोणत्याही पक्षात जाण्याचे नियोजन नसल्याचे, तिनं सांगितले. तसंच प्रियंका गांधी यांच्याबरोबरचे छायाचित्र जुने असल्याचेही त्यांनी सांगितले. मी कोणत्याही पक्षात सहभागी झालेली नाही. तसेच कोणत्याही पक्षाचा प्रचार करणार नाही. जर कोणत्या पक्षात सहभागी होणार असेल तर सर्वांत आधी माध्यमांना सांगेन, असेही सपना चौधरी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उत्तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस नरेंद्र राठी यांनी सपना चौधरी यांनी काँग्रेस सदस्यत्व स्वीकारल्याचा पुरावाच सादर केला. त्यांनी सपना चौधरी यांचा सदस्यत्व स्वीकारल्याचा अर्ज दाखवून त्यावरील त्यांची स्वाक्षरीही दाखवली. त्याचबरोबर अर्ज भरतानाचा सपना चौधरी यांचे छायाचित्रही त्यांनी सादर केले. त्यामुळे यात नेमक काय खरे हे समोर येत नाही. तसंच यामुळे या प्रकरणात गुंतागुंत आणखी वाढत आहे.

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like