‘स्टार’ डान्सर सपना चौधरीला एका ‘स्टेज शो’चे भेटायचे 3100 रुपये, आता 3 तासाचे ‘इतके’ पैसे ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – छोट्या छोट्या स्टेज प्रोग्रामने करिअरची सुरुवात करणारी प्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरीची लाईफ स्टाईल आज खूपच लक्जरीयस आहे. सपना चौधरी मीडियातील प्रसिद्ध नाव आहे. बिग बॉस ११ मध्ये झळकल्यानंतर सपना चौधरीची लोकप्रियता गगनाला भिडली. ती अनेक लक्जरी गाड्यांची मालकीन आहे. तुम्हाला माहिती आहे का की, सपना चौधरी एका कार्यक्रमाचे किती पैसे घेते ? हा आकडा तुम्ही ऐकला तर तुम्हीही डोळे मोठे कराल.

एका मुलाखतीत बोलताना सपना चौधरीने सांगितले की ती एका स्टेज शोचे २५ लाख रुपये घेते. हा डान्स कार्यक्रम संध्याकाळी सुरु होतो आणि रात्री उशीरापर्यंत सुरु चालतो. रिपोर्ट्सनुसार, जर सपना दोन किंवा तीन तासासाठी एखाद्या कार्यक्रमात सहभागी झाली तर ती काही तासांचेच तीन लाख रुपयांपर्यंत चार्ज करते. हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की, सपना चौधरीच्या सुरुवातीच्या काळात तिला एका स्टेज शोचे ३१०० रुपये मिळत असत. परंतु आज मात्र सपना काही तासांतच लाखो कमावते.

हे वाचायला जरी सहज वाटत असलं तरी तिला या पायरीपर्यंत येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे हेही तितकेच खरे आहे. ती १२ वर्षांची असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले. पित्याच्या निधनानंतर सपनाच्या खांद्यावर घराची जबाबदारी पडली. बिग बॉसमध्ये सपना चौधरीने सांगितले होते की, तिच्या पित्याच्या निधनावेळी त्यांच्यावर खूप कर्ज होतं. तिने सांगितले होते की, ती ५ रुपयांची आईसक्रिम खायलाही खूप तरसत असे.

 

आरोग्यविषयक वृत्त

You might also like