सपना चौधरीचा ‘हा’ स्टेज शो प्रचंड व्हायरल ! तब्बल 1 कोटींहून अधिक Views (व्हिडीओ)

अभिनेत्री, सिंगर, एक्स बिग बॉस स्पर्धक आणि स्टार डान्सर सपना चौधरी जेव्हा कधी स्टेजवर येते तेव्हा आपल्या ठुमक्यांनी आग लावत असते. सपना जेवढी फेमस लोकांमध्ये असते तेवढीच ती सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टीव असते. सपनाचा एक डान्स व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. सपनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

स्टार डान्सर सपना चौधरीचा एक डान्स व्हिडीओ सध्या युट्युबवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. बंदूक चलेगी या हरियाणवी गाण्यावर सपना जोरदार ठुमके लगावताना दिसत आहे. तसं पाहिलं तर तिचा हा व्हिडीओ जुनाच आहे. यात सपना जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हे गाणं एवढं व्हायरल झालं आहे की, याला अद्याप कोट्यावधी लोकांनी पाहिलं असून अजूनही लोक वारंवार हे गाणं पहात आहेत. या गाण्याला तब्बल 1 कोटीहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. सपनाची फॅन फॉलोविंग एवढी मोठी आहे की, तिची गाणी रिलीज होताच हिट होत असतात.

कोरोनामुळं लॉकडाऊनच्या काळात सपनाचे स्टेज शो बंद आहेत. त्यामुळं तिचे चाहते आता तिला इंटरनेटवर सर्च करत आहे. लॉकडाऊनमध्ये तिचं सर्चिंग वाढल्याचं दिसत आहे. यामुळं तिचे युट्युबवरील जुने अनेक व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होताना दिसत आहेत.

सपनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर डान्सर सपना चौधरीनं दोस्ती के साईड इफेक्ट्स मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सपना बिग बॉस 11 या रिअॅलिटी शोमध्येही झळकली आहे. यानंतर तिला भोजपुरी सिनेमात काम मिळालं होतं. बैरी कंगना हे तिचं स्पेशल नंबर खूप गाजलं. यानंतर तिनं पंजाबी सिनेमात स्पेशल साँग केलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like