‘स्टार डान्सर’ सपना चौधरीचं ‘मै तेरा धर्मेंद्र तू मेरी हेमा मालिनी’ गाणं ‘तुफान’ व्हायरल (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हरियाणवी डान्सर आणि सिंगर सपना चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या तालावर सर्वांना ठेका धरायला लावणाऱ्या सपनाचं आणखी एक गाणं सध्या युट्युबवर गाजताना दिसत आहे. सपना चौधरी जेव्हा कधी स्टेजवर येते तेव्हा आपल्या ठुमक्यांनी आग लावत असते. सपनाचा डान्स पाहताना चाहते अनेकदा आऊट ऑफ कंट्रोल झाल्याचे दिसले आहे. सपना जेवढी फेमस लोकांमध्ये असते तेवढीच ती सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टीव असते.

मै धर्मेंद्र तू मेरी हेमा मालिनी असं एक हरियाणवी गाणं सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. सपनानं आपल्या डान्सनं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. युट्युबवर या व्हिडीओला हजारो व्ह्युज मिळाले आहेत. पटियाला सूटमध्ये सपना ठुमके लावताना दिसत आहे. सपनानं हे गाणं गायलं आहे. सपनानं आज आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे.

सपनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कठोर मेहनत घेतल्यानंतर सपनानं आज यश मिळवलं आहे. सपनानं बॉलिवूड डेब्यू देखील केला आहे. सपना बिग बॉसमध्येही झळकली आहे.