‘स्टार डान्सर’ सपना चौधरीचा Latest डान्स व्हिडीओ ‘व्हायरल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री, सिंगर आणि स्टार डान्सर सपना चौधरी जेव्हा कधी स्टेजवर येते तेव्हा आपल्या ठुमक्यांनी आग लावत असते. सपना जेवढी फेमस लोकांमध्ये असते तेवढीच ती सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टीव असते. सपनानं इंस्टाग्रामवरून एक डान्स व्हिडीओ शेअर केले आहे जो सध्या चर्चेत आला आहे. काही तासांचत या व्हिडीओला हजारो व्ह्युज मिळाले आहे. सध्या सपनाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

सपनानं भोजपुरी स्टार खेसारी लाल यादवसोबतही स्टेज परफॉर्मंस केला आहे. सध्या अनेक ठिकाणी तिचे कार्यक्रम होताना दिसत आहेत. तिचे कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ सोशलवर धुमाकूळ घालताना दिसत असतात.

हरियाणवी सिनेमांव्यतिरीक्त सपना चौधरी बिग बॉसमध्ये दिसली होती. तिनं या शोमध्ये खूप धमाल केली आहे. यानंतर तिला भोजपुरी सिनेमात काम मिळालं होतं. बैरी कंगना हे तिचं स्पेशल नंबर खूप गाजलं. यानंतर तिनं पंजाबी सिनेमात स्पेशल साँग केलं. काही दिवसांपूर्वीच तिनं बॉलिवूड डेब्यू केला आहे. दोस्ती के साईड इफेक्ट असं तिच्या डेब्यू सिनेमाचं नाव आहे.

You might also like