‘हरियाणवी डान्सिंग क्वीन’ सपनानं आपल्या डान्सनं ‘भोजपुरी क्वीन’ आम्रपालीसोबत स्टेजवर घातला ‘धुमाकूळ’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हरियाणवी डान्सर, सिंगर आणि बिग बॉस स्पर्धक तसेच एक बॉलिवूड स्टार सपना चौधरी कोणत्या ना कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतेच. धमाकेदार डान्स व्यतिरीक्त तिचा बिंधास्त अंदाजही चाहत्यांना आवडत असतो. बहुत करून आपल्या डान्समुळंच ती चर्चेत असते. कालच(मंगळवार दि 10 मर्च 2020) सर्वत्र होळी साजरी झाली. सपनानं बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातील आंकोपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात असा डान्स केला की, भोजपुरी फॅन तिचे दीवाने झाले. हरियाणवी डान्सिंग क्वीन सोबतच भोजपुरी क्वीन आम्रपाली दुबे आणि सिंगर अंकुश राजा यांनी स्टेजवर आपल्या डान्सनं राडाचा घातला.

https://youtu.be/zr5u0W-KVNY

बिहारच्या होली मिलन समारंभातील सपना चौधरीचा हा तुफान डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत ओआहे. स्टेजवरही तिचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. सिंगर अंकुश राजा यानं सपना चौधरीसाठी त्याचं सुपरहिट साँग ‘लाखों हैं दीवाने तेरे गायलं’. सपनाचा डान्स मात्र साऱ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. नेहमीप्रमाणं आपल्या ठुमक्यांनी तिनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिच्या डान्सची चर्चा होत आहे.

खास बात अशी की, हरियाणवी डान्सिंग क्वीन सोबत भोजपुरी क्वीन आम्रपाली दुबे ही देखील स्टेजवर दिसणं म्हणजे चाहत्यांसाठी सोने सुहागा असल्यासारखं होतं. आम्रपालीनंही आपल्या ठुमक्यांनी साऱ्यांना आपलं फॅन बनवलं.