…म्हणून ‘डान्सर’ सपना चौधरीने केला होता आत्महत्येचा ‘प्रयत्न’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीने भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्व नोंदणी अभियानाद्वारे भाजपात प्रवेश केला आहे. सपना आता भाजपाची सदस्या झाली आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडिअममध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, खासदार मनोज तिवारी, हर्षवर्धन सिंह यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिने भाजपात प्रवेश केला आहे. सपना चौधरी नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. एक काळ असाही होता जेव्हा तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

Sapna-Chowdharyy

सपनाविरोधात पोलिसात तक्रार
सपना चौधरी आपल्या एका गाण्यामुळे वादात सापडली होती. १७ फ्रेब्रुवारी २०१६ रोजी गुडगावच्या चक्करपूर मध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सपना चौधरीने बिगड्या गाणं गायलं होतं. या गाण्यात तिने जातिवाचक शब्द वापरले होते. गाण्यातील शब्दांवर आक्षेप घेत हिसारमध्ये बहुजन आझाद मोर्चाने तक्रार दाखल केली होती.

म्युझिक कंपनीने तोडले संबंध
हे सगळं झाल्यानंतर हरियाणवी म्युझिक कंपनी मोर म्युझिकने सपनासोबत संबंध तोडले होते. मोर म्युझिकचे संचालक राजेश मोर यांनी घोषणा केली होती की, सपना चौधरीसोबत त्यांच्या कंपनीचे कोणतेही संबंध नाहीत. कंपनीने असेही म्हटले होते की, सपना चौधरीने जर त्यांच्या गाण्यावर परफॉर्मंस दिला तर कंपनी तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करेल.

सपनानं घेतलं विष
या प्रकरणात सपना चौधरीविरोधाथ गुडगावमध्ये केस दाखल करण्यात आली होती. यानंतर सपना चौधरी बाबत वाईट शब्दात कमेंट करण्यात आल्या. तिच्या चारित्र्याबद्दलही बोलले गेले. या सगळ्याला कंटाळून सपनानं विष घेतलं होतं आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

Sapana-Chowdhary

मग समजली सपनाची हकीकत
सपना चौधरी अनेक दिवस आयसीयुमध्ये होती. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर जेव्हा ती पहिल्यांदा मीडियासमोर आली तेव्हा तिच्या त्रासाबद्दल सर्वांना समजले. सपना चौधरी म्हणाली होती की, रोज सोशल मीडियावर तिच्याबद्दल अश्लील मेसेज पोस्ट केले जात आहेत. एवढेच नाही तर, जेव्हा सपनाने लाईव्ह प्रोग्राम केले तेव्हा लाईव्ह प्रोग्रामवेळीही खुलेआम अश्लील हरकती होताना दिसत होत्या.

आरोग्यविषयक वृत्त –

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

द्रुतगती महामार्गावर भिषण अपघातात तीन ठार, एक गंभीर जखमी

माजी खासदार राजीव सातव यांचे मराठवाडा प्रदेश कार्यकारिणी च्या अध्यक्ष पदी नाव चर्चेत

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ