Post_Banner_Top

गायिका सपना चौधरी करायला गेली एक अन् झाले दुसरेच ; जाणून घ्या काय झालं

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन हरियाणवी डान्सर सपना चौधरी काही दिवसांपूर्वी भाजपचा  प्रचार करतांना दिसली होती. सपना चौधरी सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. नुकतीच ती पुन्हा एकदा ट्रेडिशनल लुक मध्ये दिसली आहे. परंतु या वेळी तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. फोटो मध्ये सपनाने गोल्डन ब्लॅक कलरची साडी घातली आहे. सोबत तिने लाइट मेकअप, रेड लिपस्टिक आणि केस मोकळे सोडले आहेत.सपना ट्रेडिशनल लुकमध्ये खूप सुंदर दिसते आहे. परंतु कदाचित कॅमेरा अँगलमुळे तिचे पोट पुढे आलेले दिसते आहे. आणि त्यामुळे यूजर्सने  तिला कमेंट्स करायला सुरवात केली. 

 

image.png

 

एका यूजरने सपनाच्या या फोटोवर लिहिले की-‘तू प्रेग्नेंट आहेस”. एकाने लिहिले की, ‘देसी घी खाते आहेस का’ परत आणखी एकाने लिहिले की ‘ तुझ्या डिक्शनरी मध्ये स्लिम शब्द नाही का” आणखी एका यूजरने लिहिले की, ”पोट मोठे झाले दिसते आहे”. कोणीतरी लिहिले- ‘पोट मोठे झाले आहे ठीक कर आणि फिट राहा” बिग बॉस सीजन ११ नंतर सपना चौधरीची लोकप्रियता खूप वाढली आहे.बिग बॉस नंतर सपना डान्सरसह मॉडेल देखील झाली आहे. सपना आपले फोटोशुट चे फोटो नेहमी शेयर करत असते.

image.png
Loading...
You might also like