सपना चौधरीने गाण्यावर केला धमाल; व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हरियाणाची डान्सर सपना चौधरी आणि गायक विश्वजित चौधरी या दोघांचे गाण नुकतेच रिलीज झाला आहे. या गाण्याने इंटरनेटवर धमाल उडवली आहे. या गाण्याचे नाव आहे ‘मिल्की…’ विश्वजित चौधरीसह या गाण्याचे गायन रुचिका जांगिडने केले आहे. हे गाणे रिलीज होण्यापूर्वीच इंटरनेटवर फेमस झाले आहे. हे गाणे यूट्यूबवर आत्तापर्यंत 27 लाखांपेक्षा जास्तवेळा पाहिले गेले आहे.

सपना चौधरीचे चाहते एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. हेच कारण असावे हे गाण इतके फेमस होण्यामागे. या गाण्यात सपना चौधरी अत्यंत सुंदर अशा देसी अंदाजमध्ये दिसत आहे. हे गाणे 3 मिनिटे 44 सेकंदांचे आहे. मिल्की गाण्याला 24 फेब्रुवारीला यूट्यूबवर रिलीज केले होते. हे गाणे चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. तर दुसऱ्या बाजूला डान्सर सपना चौधरी आता भोजपुरी गाण्यांमध्येही डान्स करताना दिसत आहे. आता सपना चौधरी सुपरस्टार ऍक्टर दिनेश लाल यादव उर्फ निरहुआसह फिल्ममध्ये दिसणार आहे.

ऑर्केस्ट्रा टीमपासून सुरुवात
सपना चौधरीची अनेक गाणी फेमस झाली. यामध्ये ‘जलेबी” हे गाणे चांगलेच फेमस झाले. याशिवाय सपनाने आपल्या करिअरची सुरुवात हरियाणाच्या एका ऑर्केस्ट्रा टीमसोबत केली होती. त्यानंतर तिने ‘दोस्ती के साईड इफेक्टस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर ‘बिग बॉस 11’ या शोमध्येही सपना स्पर्धक म्हणून दिसली होती. आता ती चांगलीच प्रसिद्ध होत आहे.