‘स्टार डान्सर’ सपना चौधरीनं पहिल्यांदाच शेअर मुलासोबतचा फोटो ! म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री, सिंगर, एक्स बिग बॉस (Bigg Boss) स्पर्धक आणि स्टार डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) जेव्हा कधी स्टेजवर येते तेव्हा आपल्या ठुमक्यांनी आग लावत असते. सपना जेवढी फेमस लोकांमध्ये असते तेवढीच ती सोशल मीडियावर जास्त
अ‍ॅक्टीव असते. सपनाचा एक फोटो समोर आला आहे जो व्हायरल होत आहे. खास बात अशी की, या फोटोत ती तिच्या मुला सोबत दिसत आहे. हा तिच्या मुलाचा पहिला फोटो आहे. सोबतच तिनं इमोशनल कॅप्शनही लिहिलं आहे.

सपनानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात ती तिच्या मुलासोबत दिसत आहे. तिनं मुलाला कडेवर घेतलं आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं पर्पल रंगाचा स्वेटर घातला आहे. सोबतच डोक्यावर ब्लॅक कलरची कॅप घातली आहे. सपना खूपच सुंदर दिसत आहे. यात तिनं तिच्या मुलाचा चेहरा लपवला आहे. तरी त्याचा क्युट अंदाज चाहत्यांच्या नजेरतून सुटला नाही.

सपनाचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकजणांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. चाहते तिचं कौतुक करत आहे. काहींना तिच्या फोटोचं कॅप्शनही विशेष आवडलं आहे.

4 ऑक्टोबर 2020 रोजी सपनाननं एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सपनानं जानेवारी 2020 मध्ये बॉयफ्रेंड वीर साहू (Veer Sahu) सोबत एका मंदिरात कुटुंबीयांच्या उपस्थितीत सिक्रेट मॅरेज केलं होतं. बाळाला जन्म दिल्यानंतर त्याच्या लग्नाची बातमी आणि फोटो समोर आले होते. सपना चौधरीची लोकप्रियता आता गगनाला भिडली आहे.

सपनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर डान्सर सपना चौधरीनं दोस्ती के साईड इफेक्ट्स मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सपना बिग बॉस 11 या रिअ‍ॅलिटी शोमध्येही झळकली आहे. यानंतर तिला भोजपुरी सिनेमात काम मिळालं होतं. बैरी कंगना हे तिचं स्पेशल नंबर खूप गाजलं. यानंतर तिनं पंजाबी सिनेमात स्पेशल साँग केलं आहे.