Video : ‘स्टार डान्सर’ सपना चौधरीनं शेअर केलं आगामी सिनेमाचं ‘मोशन पोस्टर’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अभिनेत्री, सिंगर, एक्स बिग बॉस (Bigg Boss) स्पर्धक आणि स्टार डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) जेव्हा कधी स्टेजवर येते तेव्हा आपल्या ठुमक्यांनी आग लावत असते. सपना जेवढी फेमस लोकांमध्ये असते तेवढीच ती सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टीव असते. काही दिवसांपूर्वी सपनाचा एक फोटो समोर आला होता जो खूप व्हायरल झाला होता. खास बात अशी की, या फोटोत ती तिच्या मुलासोबत दिसली होती. आता पु्न्हा एकदा सपना एका व्हिडीओमुळं चर्चेत आली आहे.

सपनानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती एका लहान मुला सोबत दिसत आहे. आकाशाकडे बोट करत ती त्या मुलाला काहीतरी दाखवत आहे. बॅकग्राऊंडला एक म्युझिकही सुरू आहे. व्हिडीओ शेअर करताना तिनं लिहिलं की, आता फक्त 9 दिवस उरले आहेत.

सपना तिच्या लोरी या आगामी हरियाणवी सिनेमाची आतुरतेनं वाट पहात आहे. हा व्हिडीओ याच सिनेमातील मोशन पोस्टर व्हिडीओ आहे. या सिनेमातून ती आईबद्दलचा खास संदेश देताना दिसणार आहे. सपनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकजणांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. चाहते तिचं कौतुक करत आहेत.

4 ऑक्टोबर 2020 रोजी सपनाननं एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सपनानं जानेवारी 2020 मध्ये बॉयफ्रेंड वीर साहू (Veer Sahu) सोबत एका मंदिरात कुटुंबीयांच्या उपस्थितीत सिक्रेट मॅरेज केलं होतं. बाळाला जन्म दिल्यानंतर त्याच्या लग्नाची बातमी आणि फोटो समोर आले होते. 4 वर्षे दोघांनी एकमेकांना डेट केलं. वीर साहू सिंगर, कंपोजर लिरीसिस्ट, अ‍ॅक्टर आहे. त्याला हरियाणाचा बब्बू मान म्हटलं जातं.

सपनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर डान्सर सपना चौधरीनं दोस्ती के साईड इफेक्ट्स मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सपना बिग बॉस 11 या रिअ‍ॅलिटी शोमध्येही झळकली आहे. यानंतर तिला भोजपुरी सिनेमात काम मिळालं होतं. बैरी कंगना हे तिचं स्पेशल नंबर खूप गाजलं. यानंतर तिनं पंजाबी सिनेमात स्पेशल साँग केलं आहे. आता लवकरच ती लोरी सिनेमात काम करताना दिसणार आहे.