सपना चौधरीच्या गाण्यावर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सपना चौधरीचे गाणं ऐकणारा थिरकणार नाही असं क्वचितच होऊ शकतं. ‘तेरी आंख्या का यो काजल ‘ या तिच्या गाण्याने तर भोजपुरी, पंजाबी आणि बॉलीवूडमध्ये धुमाकूळ घातला. आता तर सपना चौधरीच्या याच फेमस गाण्यावर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी ठेका धरला आहे. दिल्ली पोलिसांच्या एका कार्यक्रमाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यात महिला आयपीएस अधिकारी सपना चौधरीच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
दक्षिण पश्चिम दिल्लीत शनिवारी(दि 30 मार्च) आॅल वूमन संपर्क सभे अंतर्गत सुनो सहेली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित महिला कर्मचाऱ्यांनी रंगमंचावर जाऊन नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. तेरी आंख्या का यो काजल हे सपना चौधरीचे प्रसिद्ध गाणं वाजयला लागलं आणि यानंतर उपस्थितांपैकी एक दोन महिला स्टेजवर जाऊन नाचू लागल्या. यानंतर तेथील दिल्ली पोलिसांतील महिला स्टेजवर आल्या आणि त्यांनीही सपनाच्या या गाण्यावर ठेका धरला.  या महिला आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेक महिलांनी नृत्याचा मनमुराद आनंद घेतला. यानंतर या महिला पोलिसांचा व्हिडीओ सोशलवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.