‘स्टार डान्सर’ सपना चौधरी भोजपुरी सिनेमात करणार धमाल ! निरहुआ सोबत जोडी बनवून करणार आम्रपालीची सुट्टी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अभिनेत्री, सिंगर, एक्स बिग बॉस (Bigg Boss) स्पर्धक आणि स्टार डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) जेव्हा कधी स्टेजवर येते तेव्हा आपल्या ठुमक्यांनी आग लावत असते. सपना जेवढी फेमस लोकांमध्ये असते तेवढीच ती सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टीव असते. आपल्या डान्ससाठी फेमस असणारी सपना आता भोजपुरी सिनेमात काम करताना दिसणार आहे. सपनाला भोजपुरी इंडस्ट्रीतील सुपरस्टार दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ याच्या सोबत एका सिनेमात प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. हा एक मेगाबजेट सिनेमा आहे.

असंही म्हटलं जात आहे की, निरहुआ आणि सपना चौधरी याची जोडी भोजपुरी इंडस्ट्रीला एक नवीन ओळख देऊ शकते. सपना लोकांमध्ये खूप फेमस आहे. आपल्या डान्सनं तिनं अनेकांना पागल केलं आहे.

तसं तर सपनानं काही गाण्यात, आणि सिनेमातही काम केलं आहे. इतकंच नाही तर ती बिग बॉसमध्ये देखील झळकली आहे. 2017 मध्ये आलेल्या जर्नी ऑफ भांगओवर या सिनेमात त्यानं एक आयटम नंबर केला होता. तिनं वीरे की वेडिंग मध्ये हट जा ताऊ गाण्यावर सादरीकरण केलं होतं. 2018 साली आलेल्या नानू की जानू सिनेमातही तिनं भूमिका साकारली होती. अभय देओलनंही यात प्रमुख भूमिका साकारली होती. आता ती भोजपुरी सिनेमात तिची छाप सोडणार आहे.

सपनाला भोजपुरी सिनेमात घेऊन आता निर्माते भोजपुरी सिनेमासाठी हरियाणात एक मार्केट शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. हरियाणात सपनाचं स्टेज डान्सर म्हणून खूप नाव आहे. लोकांनी याआधी तिला सिनेमात पसंत केलं नाही. भोजपुरी फिल्ममेकर्सचं म्हणणं आहे की, सपना भोजपुरी सिनेमात आल्यानंतर आधीच्या अभिनेत्रींना अडचण होऊ शकते. खास करून यात आम्रपालीच्या नावाचा समावेश आहे, जिनं जास्तीत जास्त सिनेमे निरहुआ सोबत केले आहेत.

सपनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर डान्सर सपना चौधरीनं दोस्ती के साईड इफेक्ट्स मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सपना बिग बॉस 11 या रिअॅलिटी शोमध्येही झळकली आहे. यानंतर तिला भोजपुरी सिनेमात काम मिळालं होतं. बैरी कंगना हे तिचं स्पेशल नंबर खूप गाजलं. यानंतर तिनं पंजाबी सिनेमात स्पेशल साँग केलं आहे. आता लवकरच ती लोरी सिनेमात काम करताना दिसणार आहे. सपनाला भोजपुरी इंडस्ट्रीतील सुपरस्टार दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ याच्या सोबत एका सिनेमात प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे.