जय अंबे कि जय पाऊले चालती सप्तश्रृंगी गडाची वाट

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिक जिल्ह्यातील वणी येथील आदिशक्ती श्री सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी श्रीराम नवमी पासुन भक्त गण पायी चालत जात देवीचे दर्शन घेतात. धुळ्याहुन वणी हे अंतर 150 कि.मी अंतर पायी चालत मुखातुन जय घोष करत लळिंग घाटातुन हे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांचे जथ्थे मार्गस्थ होत आहेत. हातात भगवा ध्वज मिरवत कपाळावर भगवे पट्टे बांधुन शिस्तबध्द पणे जय अबे की जय अशा घोषणा देत हे जथ्थे सप्तश्रृंगी गडाची वाट चालत आहेत.

देवीचे दर्शनासाठी जवळपास जिल्ह्यातुन म्हणजेच जळगाव, नंदुबार,धुळे,मध्य प्रदेशातुन सुध्दा चैञोत्सवात देवीला नवस बोललेला व्यक्ती आपल्या यथा शक्तीनुसार खर्च करुन देवीचा नवस फेडणे व दर्शनासाठी जातो. यात मोठ्या संख्येने महिलांसह अबालवृद्ध गावागावातुन जय अंबे की जय असा जय घोष करत आनंदाने पायी वणीला दर्शनाला निघतात.

या मार्गाने पायी जाताना त्यांचेसाठी काही दानशूर नागरीक सुध्दा मनोभावे पाणी वाटप, सरबत, चिवडा, पाकिट, भंडारा तर काही ठिकाणी तर या भाविकांना मोफत जेवण, मोबाईल चार्जिंग, आरोग्य सेवा,गोळ्या औषधे,पायांची मालीशही करुन दिली जाते. प्रत्येक जण सेवा भावेतुन हे कार्य करत असतो. सगळ्यांची एकच भावना असते.देवी दर्शन याच रुपातुन मिळते आनंद वाटतो. अशी सगळ्यांची धारणा आहे