अभिनेत्री सारा अली खाननं केलं ‘असं’ काही, आई अमृता सिंहनं देखील लपवलं ‘तोंड’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सारा अली खान आणि तिची आई अमृताने एवढा मोठा डोसा खाल्ला की, त्यांना पाहणारे लोक चकितच झाले. साराने नुकताच आई अमृताचा डोश्यासोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात अमृता सिंह चेहरा लपवत आहे आणि हसत आहे असं दिसतंय. नुकतीच सारा आणि अमृता डाएटवरून लक्ष हटवून भल्या मोठ्या डोश्याचा आनंद घेताना दिसली..

हा व्हिडीओ शेअर करताना साराने खास कॅप्शन दिलं आहे. सारा आपल्या कॅप्शनमध्ये म्हणते, “जेव्हा मी आणि माझी आई जेवायला बाहेर येतो तेव्हा आम्ही डाएटची पर्वा नाही करत. आम्ही फक्त खाण्यावर लक्ष देतो. असं जेवण काही आश्चर्याची गोष्ट नाही.”

साराने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 40 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेकजण एवढा मोठा डोसा पाहून चकित झाले आहेत.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायाचे झाले तर, लवकरच सारा कुली नंबर 1 या सिनेमात वरुण धवन सोबत दिसणार आहे. याशिवया ती इम्तियाज अलीच्या आगामी सिनेमात कार्तिक आर्यनसोबतही काम करणार आहे.

Visit : Policenama.com