सारा अली खाननं केलं भावासोबत ‘ग्लॅमरस’ अंदाजात खास फोटोशूट (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम आणि मुलगी सारा अली खान या भावा बहिणीने एका मॅगझिनसाठी खास फोटो शूट केले आहे. साराने स्वत: हे फोटो आपल्या सोशल मिडियावर शेअर केले आहेत. एकापेक्षा एक सरस पोज दिलेले फोटो चाहत्यांना पाहायला मिळाले. आता या दोघांचे फोटो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि त्याला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

साराने केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. आता लवकरच तिचा भाऊ इब्राहिम देखील बॉलिवूडमधून डेब्यू करणार अशी चर्चा आहे. परंतू त्याने त्याची अधिकृत घोषणा केली नाही.

साराने केदारनाथमध्ये अभिनेता सुशांत राजपूत बरोबर काम केले होते. या सिनेमानंतर साराला चांगली प्रसिद्धी मिळाली. यानंतर तिला लगेचच दुसरा मोठा सिनेमा मिळाला. रणवीर सिंगसह तिने सिम्बा मधून काम केले.

तिचा येणारा चित्रपट हा लव्ह आज कल 2 असणार आहे. बॉलिवूडमध्ये साराने कमी वेळात आपली चांगली जागा तयार केली. परंतू आता इब्राहिमच्या या फोटो शूटनंतर असे मानायला हरकत नाही की हा त्याचा बॉलिवूडमधील एन्ट्रीचा एक नमुना आहे.

मध्यंतरी चर्चा होती की सैफ अली खान इब्राहिमसाठी एक सिनेमा प्रोड्यूस करत आहे, परंतू त्याबद्दल अजून सविस्तर चर्चा माहिती समोर आली नाही. परंतू सैफ इब्राहिमला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. सारा-इब्राहिम ही सैफ आणि अमृता सिंग यांची मुले आहेत.

Visit : Policenama.com