…म्हणून आई अमृतासह सारा पोहचली देहरादून पोलिस स्टेशनमध्ये

मुंबई : वृत्तसंस्था – केदारनाथ चित्रपटातून आपल्या अभिनयाला सुरवात केलेली साराची सध्या सतत चर्चा होत असते. मात्र यावेळी सारा नाही तर तिची आई अमृता सिंह वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. देहरादूनमध्ये असलेल्या अमृता सिंहचे मामा मधुसूदन बिम्बेट यांच्या प्रॉपर्टीवरून एक नवीन वाद सुरु झाला आहे.अमृताचे मामा मधुसूदन यांचे कॅन्सरमुळे निधन झाले. त्यांच्या अंतिम संस्कारानंतर दोघी मायलेकींनी देहरादून पोलिस स्टेशन गाठले.

मीडिया रिपोर्ट नुसार, ज्या ठिकाणी अमृताचे मामा राहत होते त्या घराचा मालकी हक्काची केस ही कोर्टात पेंडीग आहे. म्हणून मधुसुदन यांच्या निधनानंतर लगेचच अमृता आणि सारा त्यांच्या राहत्या घरी पोहचले असल्याचे कारण समोर येत आहे. विशेष म्हणजे केअरटेकर खुशीराम गेल्या तीन वर्षापासून या प्रॉपर्टिचा सांभाळ करत आहे.

मात्र या प्रॉपर्टीवर माझाही हक् असल्याचा दावा अमृता सिंहने केला आहे. या बंगल्यात कोणीही जाऊ नये म्हणून पोलिसांनी हा बंगला सील केला होता. तब्बल १६००० स्के.फिटचा हा बंगला असून मधुसूदन यांच्यानंतर मावशी वारस आहे.जोपर्यंत त्यांच्या कुटुंबियांपैकी येथे कोणीही येत नाही तोपर्यंत पोलिसांनीच या करोंडोच्या प्रॉपर्टीची काळजी घ्यावी असे अमृताने म्हटले आहे.