‘कुली नंबर 1’ मधील गोविंदा-करिश्माचं आयकॉनिक साँग रिक्रिएट करणार वरुण आणि सारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सारा अली खान आणि वरुण धवन स्टारर कुली नंबर 1 या सिनेमाच्या शुटींगची जोरदार तयारी सुरू आहे. नुकताच या सिनेमाच्या मेकर्सने असा खुलासा केला आहे की, कुली नंबर 1 या सिनेमाच्या रिमेकमध्ये गोविंदा आणि करिश्मा कपूर यांचं आयकॉनिक साँग मैं तो रस्ते से जा रहा था रिक्रिएट करण्यात येणार आहे.

गोविंदा आणि करिश्माचं हे गाणं 90 च्या दशकातील सर्वात पॉप्युलर साँगपैकी एक आहे. हे गाणं आजही तितकंच ताजं वाटतं. कुली नंबर 1 सिनेमाच्या रिमेकमध्ये या गाण्याला पुन्हा एकदा रिक्रिएट करण्याच्या माहितीमुळे प्रेक्षकांची उत्सुकता अजून वाढली असून प्रेक्षक खूप एक्साईटेड असल्याचे दिसत आहेत.

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, “मैं तो रस्ते से जा रहा था या गाण्याचं नवीन वर्जन तनिष्क बागची कंपोज करणार आहेत. या गाण्याला रिमिक्स फ्लेवर दिला जाणार आहे.” 5 ऑगस्ट पासून या सिनेमाची शुटींग बँकॉकमध्ये सुरु होणार आहे.

या सिनेमाबाबत बोलताना डेविड धवन म्हणाले की, “या सिनेमाला हिट करण्यात आयकॉनिक साँगचं नवीन वर्जन महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. हे आमच्या सिनेमासाठी खूप मोठं गाणं आहे. या गाण्यांनी आधीच लाखोंचे मन जिंकले आहे. परंतु आता काळ बदलत आहे. त्यामुळेच मी वरुण आणि साराला घेऊन हे गाणं रिक्रिएट करणार आहे.”

डेविड धवन यांनी गोविंदा आणि करिश्मा सोबत 1995 साली शुट केलेल्या ओरिजिनल गाण्याचीही आठवण काढली. ते म्हणाले की, “ओरिजिनल साँग बंगळुरुमध्ये शुट झालं होतं.”