सारा अली खान ‘अतरंगी रे’मध्ये साकारणार ‘डबल’ रोल, ‘खिलाडी’ ‘अक्षय-धनुष’सोबत करणार ‘रोमँस’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अक्षय कुमार, सारा अली खान आणि साऊथ सुपरस्टार धनुष स्टारर अतरंगी रे या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली. डायरेक्टर आनंद एल राय यांच्या अतरंगी रे या सिनेमाबद्दल अनेक गोष्टी समोर येताना दिसत आहेत. अद्याप सिनेमातील भूमिकांविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही तरीही अनेक अफवा समोर येताना दिसत आहेत.

असं म्हटलं जात होतं की अक्षय कुमार या सिनेमात कॅमिओ रोल करणार असून धनुष आणि सारा अली खान सिनेमात रोमँस करताना दिसणार आहेत. दोघांचा धर्म वेगळा असणार असं सांगितलं जात होतं. आनंद एल राय यांनी या सर्व अफवांचं खंडन केलं आहे. अक्षयचा कॅमिओ नाही तर एक महत्त्वाचा रोल असणार आहे असंही आनंद एल राय यांनी सांगितलं आहे.

सारा करणार डबल रोल ?

अशी माहिती समोर आली आहे की सारा अली खान डबल रोल करणार आहे. एका इंग्रजी बातमीनुसार, अतरंगी रे या सिनेमात सारा अली खान डबल रोल साकारणार आहे ज्यात ती अक्षय आणि धनुष सोबत दोन वेगळ्या काळात रोमँस करताना दिसणार आहे. साराची भूमिका बिहारमधील असेल आणि धनुषची साऊथमधील असेल असंही समजत आहे. दोघांची क्रॉस कल्चर लव स्टोरी असणार आहे.

सिनेमात अक्षयचा स्पेशल लुक ?

एका रिपोर्टनुसार, सारा या सिनेमात डबल रोल करणार आहे. तिन्ही अॅक्टरचे लुक सिनेमात बदललेले दिसणार आहे. अक्षय कुमारसाठी स्पेशल लुक तयार केला जात असल्याची माहिती आहे.

असं म्हटलं जात आहे की सिनेमाची शुटींग मार्चमध्ये सुरू केली जाणार आहे. अक्षय कुमार एप्रिलमध्ये शुटींग सुरू करणार आहे. 80 ते 90 दिवसांत म्हणजेच 2020 मध्येच शुटींग पूर्ण करण्याचा प्लॅन आहे. अक्षय कुमार आणि भूषण कुमार सिनेमाची निर्मिती करत आहेत. 14 फेब्रुवारी 2021 रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.