अभिनेत्री सारा अली खान वाराणसीतून परतली, एअरपोर्टवर तोंडाला मास्क लावून जाताना दिसली ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आज (शुक्रवार दि 20 मार्च 2020 रोजी) एअरपोर्टवर स्पॉट झाली. सारा वारणसीत होती जिथून ती आता परत आली आहे. एअरपोर्टवरून जातान सारानं तोंडाला मास्क लावला होता. साराचे काही फोटो समोर आले आहेत जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. य़ात एक व्हिडीओदेखील आहे.

साराच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर एअरपोर्टवर सारा ब्लॅक कलरच्या ट्रॅकसुटमध्ये दिसली होती. सारानं चष्माही लावला होता. सारानं तिचे केसही मोकळे सोडले होते.

सारा अली खान अलीकडेच वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर होणाऱ्या जगभर प्रसिद्ध असणाऱ्या सायंकाळच्या गंगा आरतीमध्ये सहभागी झाली होती. सारानं तिची आई अभिनेत्री अमृता सिंहसोबत विधीवत वैदिक रिती रिवाजानं गंगा आरती आणि पूजा केली होती. साराचे यादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओदेखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. सारा अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी आहे.

https://www.instagram.com/p/B99F4kEjHyY/

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करत आहे. या सिनमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष काम करत आहेत.

https://www.instagram.com/p/B99D5h-B3xZ/

https://www.instagram.com/p/B99DNbEhfLe

https://www.instagram.com/p/B9l_5XQhYPt/