‘लॉकडाऊन’मध्ये ब्राऊनीजसोबत आंब्याचा आनंद घेतेय सारा अली खान ! शेअर केला फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   बॉलिवूड स्टार सारा अली खान वेगानं पुढे येणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. अलीकडेच साराचा हा वर्कआऊट व्हिडीओ समोर आला होता. यानंतर आता तिनं एक फोटो तिच्या इंस्टा स्टोरीला शेअर केला आहे ज्याची खूप चर्चा होताना दिसत आहे.

सारानं नुकताच तिच्या इंस्टा स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे या तिनं ब्राऊनीजच्या किनाऱ्यावर मँगो स्लाईज सजवल्याचं आहेत. यावर ड्राय फ्रुटची गार्निशिंग करण्यात आली आहे. साराची ब्राऊनीज चाहत्यांनाही खूप आवडली आहे. सारालाही तिचं हे कॉम्बिनेशन खूप आवडलं आहे. तिनं फोटो शेअर करताना असंही म्हटलं आहे की, चॉकलेट्स मँगोसोबत बेस्ट आहेत.

सध्या साराचा हा ब्राऊनीवाला फोटो खूप व्हायरल होत आहे. अनेकांनी या कॉम्बिनेशनसाठी तिचं कौतुक केलं आहे. लॉकडाऊनमध्ये सारा आई अमृता सिंह आणि भाऊ इब्राहिम अली खान सोबत टाईम स्पेंड करत आहे.

https://twitter.com/30Kumaar/status/1262327407912071168?s=20

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करत आहे. या सिनमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष असणार आहेत.