मोठा झाल्यानंतर अ‍ॅक्टर होणार तैमूर अली खान ? बहिण सारानं दिला ‘हा’ सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सारा अली खान सध्या लव आज कल 2 सिनेमामुळे चर्चेत आहे. चाहत्याना सिनेमात खास काही आवडला नाही असं दिसत आहे. कारण सिनेमाची कमाई घटताना दिसत आहे. सारा आपल्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. साराचा भाऊ तैमूर अली खान सर्वात चर्चित स्टारकिडपैकी एक आहे. सारानं तैमूरच्या लोकप्रियतेवर भाष्य केलं आहे. तिनं तैमूरला एक सल्लाही दिला आहे.

एका मलाखतीत बोलताना तैमूरबद्दल प्रश्न विचारल्यानंतर सारा अली खान म्हणाली, “साधारणपे त्या मुलांवर जास्त लक्ष ठेवलं जातं जे सिनेमा किंवा फिल्मी घराण्यातून आहे. कधी कधी ही घातक ठरताना दिसतं. मला असं वाटतं की तैमूरच्या शिक्षणावर आधी लक्ष द्यायला हवं. त्यालाही कळायला हवं की त्याला आयुष्यात काय करायचं आहे.”

तैमूरच्या अॅक्टर बनण्यावर इंडस्ट्रीत खूप चर्चा होताना दिसत आहे. यावर साराला विचारलं असता ती म्हणाली, “तैमूरला आधी याचं शिक्षण घ्यायला हवं. यानंतरच यावर निर्णय घेतला जावा असं मला वाटतं.” असंही सारानं सांगितलं.

View this post on Instagram

✨ #taimuralikhan

A post shared by Taimur Ali Khan❤️Urmi (@taimuralikhanworld) on

साराच्या लव आज कल 2 या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर 14 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. सिनेमा रिलीज झाल्यानंतर सोशलवर अनेक निगेटीव कमेंट येताना दिसल्या. सिनमानं पहिल्या दिवशी 12.4 कोटींची कमाई केली. परंतु दुसऱ्या दिवशी मात्र कमाईचा आकडा घसरताना दिसला. शनिवारी सिनेमानं केवळ 8 कोटी कमावले. याशिवाय रविवारीही सिनेमानं 8 कोटींच्या जवळपास गल्ला केला.

 

You might also like