‘बिग बी’ अमिताभच्या ‘त्या’ वर्तनाबद्दल साराने केली होती सैफकडे ‘तक्रार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची ‘कश्मिरकी कली’ शर्मिला टागोरने एका सभागृहात सारा अली खानचे काही किस्से सांगितले. तिने अभिनेता अमिताभ बच्चनचा किस्सा सांगितला. शर्मिला म्हणाल्या, चित्रपट ‘विरुद्ध’ च्या सेटवर सारा अली खान आली होती. त्यावेळी एक सीन चालु होता. त्या सीनमध्ये आजी शर्मिला टागोरसोबत अमिताभ रुड वागत होता. ते साराने पाहिल्यानंतर घरी गेल्यानंतर तिने वडिल सैफ अली खानकडे अमिताभची तक्रार केली होती.

त्या सीनबद्दल सविस्तर सांगताना शर्मिला म्हणाल्या, ‘एका सीनमध्ये मला जोरात पळायचे होते आणि मी तेच करण्याचा प्रयत्न करत होते. याच दरम्यान अमिताभ बच्चनला मला थांबवायचे होते. माझी अति घाई पाहून अमिताभ बच्चन म्हणाले की, जास्त घाई करण्याची गरज नाही. हा चित्रपट ( सत्यजीत रे ) चा नाही. सेटवर झालेली घटना पाहून साराने सैफला सांगितली होती. सारा म्हणाली अम्मासोबत अमिताभ बच्चन चुकीचे वागले. सारा मला अम्मा हाक मारते. मग मी साराला सांगितले की, ते ज्या पद्धतीने वागले माझ्यासोबत ते चुकीचे नव्हते. सारा लहानपणापासून समजदार होती. ती खूप छान बोलते. मी तिचे अनेक मुलाखती पाहिल्या आहेत. ‘

शर्मिला यांनी अजून एक किस्सा साराबद्दल सांगितला. ते म्हणाले की, ‘सारा ५ वर्षाची असताना एक दिवस मी तिली फोनवर एकदम शुद्ध भाषेत बोलताना पाहिले. तिने एक रॅंडम नंबर लावला आणि म्हणाली की, तुमच्या नावावर एक बक्षिस आले आहे आणि त्यानंतर तिच्या बोलण्याची स्टाइल तिचा कॉन्फिड्स बघण्यासारखा होता. मी तिला बघतच राहिले.’

‘एकदा सैफ एका हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होता. त्यावेळी अमिताभ बच्चन त्याला पहायला आले होते. त्यावेळी सारा अमिताभसोबत बोलण्यात मग्न झाली होती. त्यांच्या बोलण्याचा विषय होता की, मेल जेंडर कसे असतात ? व फिमेल जेंडरमध्ये काय खास असते ? गप्पा मारताना साराने असे काही बोलले. यावर अमिताभ म्हणाले, असा कोणता शब्द नसतो. लहानपणापासून साराच्या बोलण्यात कॉन्फिडन्स होता.’ शर्मिला टागोर सध्या आपली आत्मकथा लिहत आहे. शर्मिला म्हणाल्या की, जर माझ्या जीवनातील कथेवर कधी चित्रपट बनवला. तर यामधील माझी भूमिका साराशिवाय कोणीच चांगली करु शकत नाही.

 

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन