Sara Ali Khan | अखेर क्रिकेटर सोबत लग्न करणार का नाही यावर साराने दिलं उत्तर…!

पोलीसनामा ऑनलाइन – Sara Ali Khan | बॉलीवुडची (Bollywood) आघाडीची अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही कायम चर्चेच्या रिंगणात असते. सारा ही अभिनय आणि चित्रपटांबरोबरच तिच्या अफेअरस् मुळेही चर्चेत असते. सध्या तिचे नाव स्टार क्रिकेटर शुभमन गिलसोबत (Cricketer Shubman Gill) जोडले जात आहे. अनेक वेळा त्या दोघांना एकत्र पाहण्यात आले आहे. सर्वत्र सारा अली खान आणि शुभमन गिलच्या (Sara And Shubman) चर्चा असून यावर आता साराने मौन सोडले आहे. एका मुलाखतीमध्ये सारा (Sara Ali Khan) तिच्या लग्नाविषयी बोलली असून, तिला कसा पती हवा आहे याबाबत तिने सांगितले आहे.

Advt.

साराची आजी शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांनी देखील क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडींबरोबर (Mansoor Ali Khan Pataudi) लग्न केलं होतं. आता साराही तिच्या आजीच्या पावलावर पाऊल ठेवून क्रिकेटरशी लग्न करणार का? असा सवाल साराला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे चोख उत्तर देत साराने तिला नेमका कसा जोडीदार पाहिजे हे कबुल केले आहे.

सारा मुलाखतीदरम्यान म्हणाली की, “ती व्यक्ती क्रिकेटर किंवा उद्योगपती असू शकते, पण मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या त्याचे विचार माझ्याशी जुळले पाहिजे. माझा जोडीदार होण्यासाठी तो क्रिकेटर, व्यावसायिक, डॉक्टर असणे आवश्यक आहे असं मला वाटतं नाही. पण आमच्या दोघांचे विचार आणि मन जुळणं फार महत्वाचं आहे.”

साराच्या या विचाऱ्यावर नेटकरी कौतुक करत आहे व शुभमन गील यादृष्टीनेही योग्य असल्याचे
सारा अली खानला सांगत आहे. सारा अली खानचा सध्या ‘जरा हटके जरा बचके’ (Jara Hatke Jara Bachke)
सिनेमा चित्रपटगृहात धुमाकुळ घालत असून प्रेक्षक या चित्रपटाला उदंड प्रतिसाद देत आहे.
या चित्रपटात सारासोबत अभिनेता विकी कौशल (Actor Vicky Kaushal) झळकला आहे.
या आधी सारा तिच्या महाकालच्या दर्शानावरून ट्रोल झाली होती. देवाच्या भक्तीवरून ट्रोल करणाऱ्या व्यक्तींना
साराने (Sara Ali Khan) चोख उत्तर दिले होते. आता तिच्या लग्नाच्या विषयावरही तिने उत्तर दिले आहे.

Web Title : Sara Ali Khan | Finally, Sara answered why she will not marry a cricketer…!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | काय आहेत आजचे पुण्यातील सोन्या-चांदीचे दर? जाणून घ्या

Petrol Diesel Price Today | सर्वसामान्यांसाठी दिलासा! पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता; जाणून घ्या आजचा दर

Maharashtra Monsoon Update | पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता; मुंबई, ठाणेसह कोकणातही बरसणार सरी