‘लॉकडाऊन’मध्ये डान्सवर फोकस करतेय सारा अली खान, चाहत्यांनाही दिला ‘हा’ मेसेज व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार सारा अली खान वेगानं पुढे येणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. अलीकडेच सारानं तिचा क्लासिकल डान्सवाला व्हिडीओ शेअर करत दाखवून दिलं होतं की, त्यात ती किती तरबेज आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात सारानं तिच्या डान्सवर फोकस करणं सुरू केलं आहे. नुकताच तिनं आणखी एका डान्स व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

सारानं तिच्या इंस्टावरून तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात सारा डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना सारा म्हणते, “हा माझा सल्ला आहे की, तुम्ही कोणतीही पारंपरिक गोष्ट करा. याला रियाज आणि ट्रेनिंगची जोड द्या आणि मग सतत याची पुनरावृत्ती करा. हे तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. या क्वारंटाईनच्या काळात कोणतंही रूटीन तुम्हाला कंडिशन करण्यास मदत करेल. सर्वांनी घरीच रहा. सुरक्षित रहा” असंही सारानं शेवटी म्हटलं आहे.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करत आहे. या सिनमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष असणार आहेत.

https://www.instagram.com/p/B9-l5ZHpA-D/

https://www.instagram.com/p/B9DtF3cB2gy/