सारा अली खान मंदिराबाहेर आल्यानंतर मुलानं मागितले पैसे, ‘अशी’ होती ‘रिअ‍ॅक्शन’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सारा अली खान सध्या सिनेमांसोबतच सोशल मीडियावर खूपच चर्चेत दिसत आहे. सध्या साराचा एक व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात सारा एका मुलाची मदत करताना दिसत आहे. साराने या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सर्वजण साराचं कौतुक करताना दिसत आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत आहे की, सारा मुक्तेश्वर मंदिराच्या बाहेर आहे. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर सारा कारमध्ये बसते अशात तिला दिसतं की, एक मुलगा तिच्याकडे मदत मागत आहे. अशात ती कारमध्येच कोणाकडूनतरी पैसे घेते आणि त्याला मुलाला मदत करते. यानंतर ती हात जोडत धन्यवाद बोलते आणि कारचा दरवाजा बंद करते. साराच्या सिंपल लुकनेही सर्वांचं मन जिंकलं. साराने सिंपल व्हाईट सूट घातला होता.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती लव्ह आज कल 2 या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात ती कार्तिक आर्यनसोबत दिसेल. याशिवाय ती कुली नंबर 1 या सिनेमाच्या रिमेकमध्येही काम करणार आहे. या सिनेमात सारा वरूण धवन सोबत काम करताना दिसणार आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like