व्हाईट बिकिनी घालून सारा अली खाननं घेतली समुद्रात उडी, म्हणाली – ‘जलपरी, मैं चली’ ! व्हिडीओ झाला व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम   –   बॉलिवूड स्टार सारा अली खान वेगानं पुढे येणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. अलीकडेच साराचा एक थ्रोबॅक फोटो समोर आला होता ज्याची सोशलवर खूप चर्चा झाली होती. यानंतर पुन्हा एकदा तिचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होत आहे.

सारानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला होता. यात ती मालदीवमध्ये व्हॅकेनशचा आनंद घेत होती. व्हिडीओत दिसत आहे की, तिनं व्हाईट कलरची बिकीनी घातली आहे. समुद्राच्या पाण्यात डाईव मारत ती पोहण्याचा आनंद घेत आहे. व्हिडीओ शेअर करताना सारा म्हणाली होती, जलपरी, मैं चली.

साराचा हा व्हिडीओ जुना असला तरी सोशल मीडियावर व्हायल होताना दिसत आहे.अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिली आहे. अनेकांनी तिचं कौतुकही केली आहे. तिच्या हॉटनेसही साऱ्यांना आवडला आहे.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करत आहे. या सिनमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष असणार आहेत.