Sara Ali Khan-Kartik Aaryan | ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच एकत्र दिसणार सारा-कार्तिक; ‘या’ चित्रपटाच्या माध्यमातुन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
315
Sara Ali Khan-Kartik Aaryan | kartik aaryan sara ali khan will be seen together first time after their breakup in aashiqui 3
file photo

पोलीसनामा ऑनलाईन : Sara Ali Khan-Kartik Aaryan | सिद्धार्थ रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा “आशिकी 2” हा रोमँटिक चित्रपट “आशिकी” या चित्रपटाचा सिक्वेल असून तो सुपरहीट ठरला होता. हा चित्रपट 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.आता “आशिकी ३” हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासू करणार आहेत. “आशिकी 3 “मध्ये कार्तिक आर्यन हा मुख्य भूमिकेत असणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र, कार्तिक आर्यन याच्यासोबत कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत असेल यावर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगत होत्या. आता आशिकी 3 या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत त्याची एक्स गर्लफ्रेंड सारा अली खान (Sara Ali Khan-Kartik Aaryan) असणार असल्याची चर्चा सुरू आहे. सारा किंवा निर्मात्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

याआधी सारा आणि कार्तिक “लव्ह आज कल 2 “मध्ये एकत्र दिसले होते. याच सिनेमाच्या सेटवर दोघे एकेमकांच्या प्रेमात पडले होते. हा चित्रपट फारसा चालला नाही. या चित्रपटानंतर दोघांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगल्या होत्या. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा आघाडीच्या कलाकारांपैकी एक मानला जातो. ‘प्यार का पंचनामा-2′ या चित्रपटातून कार्तिकला खरी ओळख मिळाली. कार्तिक हा त्याच्या कामाबरोबरच अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे. (Sara Ali Khan-Kartik Aaryan)

कार्तिकचं नाव आतापर्यंत बऱ्याच अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे.
त्यातही सैफ अली खानची मुलगी सारा अली खानशी त्याचं अफेअर बरंच गाजलं होतं.
बॉलिवूडचं गोंडस कपल म्हणून सारा अली खान आणि कार्तिक आर्यनला ओळखलं जात होतं.
या दोघांच्या जोडीला प्रेक्षकही खूप पसंत करत होते.
परंतु अचानक सारा आणि कार्तिकनं ब्रेकअप करत चाहत्यांना धक्का दिला होता.

Web Title :- Sara Ali Khan-Kartik Aaryan | kartik aaryan sara ali khan will be seen together first time after their breakup in aashiqui 3

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Priyanka Chopra | अभिनेत्री प्रियांका चोप्राचे वेकेशन एन्जॉय करतानाचे फोटो व्हायरल

Kangana Ranaut | सिद्धार्थ-कियाराच्या विवाह सोहळ्यापूर्वी कंगना रणौतने त्यांच्यासाठी लिहिली ‘हि’ खास पोस्ट

Nawazuddin Siddiqui | अभिनेता नवाजुद्दीनच्या अडचणींमध्ये वाढ; पत्नीच्या आरोपांनंतर कोर्टाने बजावली नोटीस