मुंबईच्या रस्त्यावर ‘शॉर्ट’ ड्रेसमध्ये दिसला साराचा ‘क्यूट’ अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या बी-टाउनमधील एक सुपर स्टायलिश दिवा आहे. सारा तिच्या हसमुख स्वभावासाठी ओळखली जाते आणि तिचा हा अंदाज तिच्या फोटोंमध्ये देखील दिसत असतो.

सारा नेहमी आपल्या फॅशन सेंसमुळे चर्चेमध्ये असते. साराने कमी दिवसातच आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. पुन्हा एकदा तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती रात्रीच्या दरम्यान रस्त्यावर स्पॉट झाली आहे. फोटोमध्ये साराने ब्लू-कलरचा ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये सारा खूपच क्यूट दिसत आहे.

साराची नजर मीडियाकडे जाताच तिने स्टायलिश अंदाजात पोज दिले आहेत. साराचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चाहत्यांना तिचे हे फोटो खूप पसंतीस पडले आहे. तिच्या फोटोंना चाहत्यांनी कमेंट देखील केल्या आहेत.

तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर सध्या सारा ‘कुली नंबर 1’ च्या रिमेकमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत वरुण धवन देखील दिसणार आहे. याव्यतिरिक्त सारा कार्तिक आर्यनसोबत ‘लव आज कल’ मध्येही दिसणार आहे. हा चित्रपट ‘वेलेनटाइन्स डे’ ला प्रदर्शित होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/