सुशांतच्या निधनानंतर ‘नि:शब्द’ झाली त्याची पहिली ‘कोस्टार’ सारा अली खान ! शेअर केला ‘असा’ फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. आता सुशांतची पहिली कोस्टार बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिनंही शोक व्यक्त केला आहे.

सारानं सुशांतच्या निधनानंतर सारनं तिचा आणि सुशांतचा असा फोटो शेअर केला आहे जो पाहून कोणाचंही हृदय तुटेल. फोटो शेअर करताना सार काहीच लिहू शकली नहाीये. यावरूनच लक्षात येत आहे की, सुशांतच्या जाण्यानं सारालाही किती जोरदार धक्का बसला आहे. साराचा हा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

 

 

समोर आलेल्या फोटोत दिसत आहे की, आतून रोज घुसमटणारा अभिनेता फोटोत खुलून हसताना दिसत आहे. साराही त्याच्याकडे पाहून स्माईल करत आहे.

2018 साली रिलीज झालेल्या केदारनाथ या सिनेमातून सुशांत सिंह राजपूत सोबत सारा अली खाननं तिचा बॉलिवूड डेब्यू केला होता.

साराचा पहिला कोस्टार
सुशांत सिहं राजपूत सारा अली खानचा पहिला कोस्टार होता. सारानं त्याच्यासोबत खूप टाईम स्पेंड केला होता आणि केदारनाथच्या सेटवर खूप काही शिकलं होतं. यावेळी सारा आणि सुशांतची चांगली मैत्री झाली होती. दोघांच्या डेटींगच्याही अनेक बातम्या समोर आल्या होत्या.