अतरंगी रे ! ‘खिलाडी’ अक्षय आणि ‘धनुष’नं एकाच वेळी केलं ‘सारा’ला ‘KISS’, नंतर झाला ‘हा’ खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची क्युट अ‍ॅक्ट्रेस सारा अली खान लवकरच एका आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सारानं इंस्टाग्रामवरून या बाबत माहिती दिली आहे. साराचा एका फोटो समोर आहे जो सारानंच पोस्ट केला आहे. फोटोत दिसत आहे की, बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि साऊथचा सुपरस्टार धनुष एकाच वेळी साराच्या दोन्ही गालांवर किस करत आहेत. अतरंगी रे असं या सिनेमाचं नाव आहे.

सारानं इंस्टाग्रामवरून हा फोटो शेअर करताना म्हटलं आहे की, “मला माझ्या नशीबावर विश्वास बसत नाहीये. मी माझा आगामी सिनेमा अतरंगी रे मध्ये आनंद एल राय सोबत काम करत आहे. ए आर रहमान यांनी सिनेमाला म्युझिक दिलं आहे. आमच्यासोबत काम करण्यासाठी अक्षय कुमार सरांना धन्यवाद. खूप टॅलेंटेड आणि एक चांगला माणूस धनुष यांनाही धन्यवाद.”

या पोस्टरमध्ये धनुष हा चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. 2013 साली धनुषचा रांझणा सिनेमा आला होता. यातील धनुषच्या भूमिकेनं सर्वांचं मन जिंकलं होतं. कुंदन असं त्याच्या भूमिकेचं होतं. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. तरुणांना हा सिनेमा विशेष आवडला होता. इतकेच नाही तर जिशान अय्यूबनं साकारलेली मुरलीची भूमिकाही चाहत्यांना आवडली होती.