टायगर श्रॉफ च्या ‘बागी’ ३ साठी साराचा नकार कारण…

मुंबई : वृत्तसंस्था – खूप कमी वेळेत सारा अली खानने बॉलिवूड मध्ये स्थान मिळवून आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिने धमाके दार पदार्पण केले. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत सोबत तिची ऑनस्क्रीन जोडी दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चंगली कमाई केली होती. यानंतर रोहित शेट्टीच्या’सिम्बा’ सारख्या बिग बजेट सिनेमात दिसली होती. तिच्या याचित्रपटाने ही बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कामे केली होती . या चित्रपटांच्या यशानंतर तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर येत आहे. पण तिने एका चित्रपटाला रिजेक्ट केले आहे.

एका वृत्तानुसार साराने टायगर श्रॉफ च्या बागी ३ चित्रपटाला नकार दिल्याचे वृत्तसमोर आले आहे.’बागी ३’चित्रपटात साराने टायगर सोबत काम करण्यास नकार दिला आहे. कारण या चित्रपटातील तिची भूमिका एकदम छोटी होती. आणि त्या भूमिकेत खूप कमी वेळ ती पडद्यावर दिसली असती म्हणूनच तिने हा चित्रपट स्वीकारला नाही अशी चर्चा होत आहे. साराची सिनेमा रिजेक्ट करण्याची ही पहिलीच वेळ नाही याआधी तिने ‘लव्ह आज कल २’ चित्रपट स्क्रिप्ट न आवडल्यामुळे नाकारला होता.

‘बागी’ आणि ‘बागी२’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरले होते. ‘बागी’ चित्रपटात श्रद्धा कपूर तर ‘बागी२’ चित्रपटात दिशा पाटणी टायगर श्रॉफ च्या अपोझिट दिसल्या होत्या. सारा अली खानने चित्रपटात येण्यापूर्वी वजन घटवले होते. त्यामुळे पदार्पणापूर्वीच सारा अली खान चर्चेत आली होती.