Sara Ali khan | बॉडीगार्डच्या ‘या’ कृत्यामुळं सारा अली खानला मागावी लागली माफी, व्हिडिओ झाला व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Sara ali khan | बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहे. नुकताच अभिनेत्री सारा अली खानचा (Sara Ali khan) ‘अतरंगी रे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सारासोबतच या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि धनुष (Dhanush) पाहायला मिळणार आहे.

 

 

चित्रपटातील ‘चका चक’ हे गाणं नुकताच प्रदर्शित झालंय. या गाण्याचा इव्हेंट सोमवारी लॉंन्च झाला. सारा सोमवारी इव्हेंट वरून येतच असतानाचा, एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये (Sara ali khan) सारा प्रेक्षकांची माफ मागताना दिसतीये. तसेच बाहेर झालेल्या व्हिडीओमध्ये असं दिसतं की, इवेंट मधून बाहेर आल्यानंतर साराच्या आसपास अनेक फोटोग्राफर्स आणि सेक्युरिटी गार्ड आहेत. तसेच एका गार्डनं फोटोग्राफरला धक्का दिल्यानं सारानं सर्व फोटोग्राफरची माफी मागितली आणि गार्डला म्हणाली, तुम्ही कोणाला धक्का दिला? तर गार्ड म्हणाला, कोणाला नाही. तर सारा म्हणते, तुम्ही ज्यांना धक्का दिला आहे. ते तर निघून गेलेत, प्लीज असं करू नका. कृपया कोणालाही धक्का देऊ नका. त्यानंतर ती सगळ्या फोटोग्राफर्स म्हणाली, सर्वांचे आभार आणि मनापासून सॉरी.

 

 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
तर प्रेक्षकांना साराचा माफी मागण्याचा अंदाज प्रचंड प्रमाणात आवडला आहे.
तर अनेक नेटकऱ्यांनी साराच्या स्वभावाचं खूप कौतुक केलं. त्यामुळे तिला अनेक नेटकरी ‘स्वीट’ म्हणून संबोधतात.

 

 

दरम्यान, 24 डिसेंबर 2019 रोजी साराचा ‘अतरंगी रे’ (Atrangi re) हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटामधील ‘चका चक’ गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आणि त्याखाली आता प्रत्येक लग्नात हे गाणं वाजणार, असं कॅप्शन लिहिलं आहे.
या चित्रपटामध्ये सारा एक बिहारी मुलगी आहे, तर धनुष तमिळ मुलगा आहे.
या दोघांचं जबरदस्ती लग्न झालेला दाखवला आहे.

 

 

 

 

 

Web Title : Sara Ali Khan | sara ali khan apologizes on behalf of her security guard netizens call her sweet watch video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा