Sara Ali khan | सारा अली खान झाली महाकालच्या भक्तीमध्ये तल्लीन; मात्र नेटकऱ्यांनी धरले धारेवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali khan) ही कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असते. तिच्या चित्रपटाबरोबरच तिचे अफेरस् आणि वैयक्तिक आयुष्य यावरुनही ट्रोलर्स तिला निशाणा करत असतात. आज देखील ती नेटकऱ्यांकडून ट्रोल होत आहे आणि त्याचे कारण आहे तिचे देवदर्शन. सारा ही कायम हिंदू देवदेवतांच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसते. ती मुस्लीम (Muslim) असूनही तिची देवदेवतांवर असणारी श्रद्धा यावरून तिच्यावर टीका केली जाते. आता तिने महाकाल (Mahakal,Ujjain) मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने तिच्यावर पुन्हा टीकेची झोड उठवली जात आहे. (Sara Ali khan)

 

Advt.

सारा अली खानचा अभिनेता विकी कौशल (Actor Vicky Kaushal) याच्यासोबत लवकरच ‘जरा हटके जरा बचके’ (Jara Hatke Jara Bachke) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 2 जूनला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे सारा आणि विकी जोरदार प्रोमोशन (Promotion) करत आहे. या दरम्यान ते दोघे उज्जैनच्या शिवमंदिरात महाकाल मंदिरात गेले. मंदिरात त्यांनी पूजा केली व भस्म आरतीस (Bhasma Aarti Mahakal) हजेरी लावली. त्याचे महाकाल मंदिरातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंटस् केल्या आहेत.

 

 

साराने तिच्या ऑफिशल सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये सारा आणि विकी गाभाऱ्यात हात जोडून बसलेले दिसत आहेत. हा फोटो शेअर करत तिने, “जय भोलेनाथ.” असे कॅप्शन दिले आहे. याला ट्रोल करत अनेकांनी कमेंटस् केल्या आहेत. एकाने कमेंटमध्ये लिहिले आहे की, ‘तुम्ही हिंदू देवतांची पूजा का करता? जर तुम्हाला तुमच्या अल्लाहने सांगितलं आहे की देव हे अस्तित्वातच नाही.’ तर दुसऱ्याने लिहिले आहे की, ‘ आम्हांला लाज वाटते तुझी.” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “तुझ्या मुस्लीम असण्याचा काही फायदा नाही, जर तू देवाची भक्ती करत बसलीस तर. त्यापेक्षा हिंदूच हो.” तर आणखी एकाने लिहीले की, “तुझं नाव बदलून टाक.”

फक्त साराच नाही तर तिचे वडिल अभिनेता सैफ अली खान (Actor Saif Ali Khan) यांच्यावर देखील अनेकांनी निशाणा साधला आहे.
एकाने कमेंट केली आहे की,“तुझे वडील मुस्लीम असून मंदिरात पूजा करतात.
मला लाज वाटते, तुझं चांगलं संगोपन व्हावं अशी माझी इच्छा आहे,”

 

सारा अली खान (Sara Ali khan) या आधीही मंदिरात जाण्यावरून व हिंदू देवाची (Hindu God) पूजा करण्यावरून ट्रोल झाली आहे.
याआधीही तिला या मुद्द्यावरून ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
तिचा पदार्पणातील चित्रपट केदारनाथ (Kedarnath) वेळेही तिला खूप ट्रोल करण्यात आले होते.

 

 

 

Web Title :  Sara Ali Khan | Sara Ali Khan became immersed in
the devotion of Mahakal; But the netizens held on

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा