सारा अली खाननं शेअर केला भाऊ इब्राहिम सोबतचा ‘थ्रोबॅक’ फोटो, तुम्हालाही हसू आवरणार नाही

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार सारा अली खान वेगानं पुढे येणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. अलीकडेच साराचा हा वर्कआऊट व्हिडीओ समोर आला होता. यानंतर आता तिनं एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे ज्यात ती तिचा भाऊ इब्राहिम सोबत दिसत आहे.

सारा आणि इब्राहिमचा एक थ्रोबॅक फोटो समोर आला आहे. यात इब्राहिम सफेद चादर अंगावर घेऊन उभा आहे आणि मेकअप भुतासारखा केला आहे. यात दोघंही कॅमेऱ्याकडे बघत स्माईल करत आहेत. यावरून सारा म्हणते, एके काळी इब्राहिम माझ्याहून जास्त भयानक होता. सारा आणि इब्राहिमचा हा थ्रोबॅक फोटो साऱ्यांनाच आवडला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सारा नेहमीच इब्राहिमसोबत फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच तिनं इब्राहिमसोबत वर्कआऊट करतानाचा फोटो शेअर केला होता.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करत आहे. या सिनमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष असणार आहेत.