कोण आहे ही Hottest नर्स ? सारानं Video शेअर करत केलं ‘कौतुक’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   १९९५ मध्ये गोविंदा (Govidna) आणि करिश्मा कपूर (Karishma Kapoor) यांचा डेव्हिड धवन (David Dhawan) यांनी दिग्दर्शित ‘कुली नं १’ हा विनोदी चित्रपट प्रचंड गाजला होता. त्याच्याच रिमेकमध्ये सारा-वरुण दिसणार आहेत. २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या दिवशी हा चित्रपट Amazon Prime Video प्रदर्शित होणार आहे. यामध्ये जॉनी लिव्हर, परेश रावल, जावेद जाफरी आणि राजपाल यादव यांच्याही भूमिका आहेत.

दरम्यान, अभिनेत्री सारा अली खान (Sara ali Khan) आणि वरुण धवन (Varun Dhawan) यांच्या कुली. नं.१ (Coolie No 1) या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. ही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी वरुण धवन आणि सारा अली खान या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे मजेदार किस्से व्हिडीओ आणि फोटोद्वारे सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत असतात. असाच एक व्हिडीओ सारा अली खाननं नुकताच शेअर केला आहे.

कुली. नं.१ चित्रपटातील वरुणच्या विविध भूमिकांपैकी ही एक भूमिका आहे. त्यासाठी त्याला बराच वेळ बसून मेकअप करून घ्यावा लागत असे. या मेकअप दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये वरुण सहनशीलपणे मेकअप करून घेतो आहे मात्र सारा त्याची गंमत करते आहे. सारा या व्हिडिओच्या सुरुवातीला ‘प्लीज देखिये वरुणा, असं म्हणून वरूणची ओळख करून देत आहे. वरुणाच्या रूपातील वरुण धवनची तारीफ करताना सारा थकत नाही आहे. तिच्या या अवखळपणाला सेटवरच्या लोकांनी दाद दिलीच पण इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओला चाहत्यांनीही दिलखुलास दाद दिली आहे. मीट द हॉटेस्ट नर्स वरुणा धवन’ अशी कॅप्शन देत तिनं वरुणा धवन हिची ओळख करून दिली आहे. अर्थातच ही नर्स म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून स्वत: वरुण धवन आहे.

या व्हिडिओला तब्बल ११ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. साराच्या चाहत्यांनी ‘यु आर सो क्युट’ अशी कमेंट केली आहे, तर कोणी ‘हॉटेस्ट नर्स’ला प्रतिसाद देत ‘खरंच हॉटेस्ट’ असं म्हटलं आहे. अनेकांनी लाफ्टर इमोजी देखील शेअर केल्या आहेत.