साराचा १४ वर्षांपूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल  

मुंबई : वृत्तसंस्था – सैफ आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खानने आपल्या पहिल्याच चित्रपटातून बॉलिवूड मध्ये दमदार पदार्पण केलं. तिचा पहिला चित्रपट ‘केदारनाथ’ ने बॉक्स ऑफिसवर ठिक ठाक कमाई केली. याचित्रपटात तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. याचित्रपटानंतर ती ‘सिम्बा’ चित्रपटात झळकली. या सिनेमाने १०० कोटींहून अधिक कमाई केली. केवळ दोनच चित्रपटात मिळालेल्या यशामुळे तिचे अनेक चाहते निर्माण झाले आहे. सोशल मीडियावरही सक्रिय राहणारी सारा चित्रपटात झळकण्याआधी एका शोमध्ये दिसली होती. साराचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ २००५ मधला आहे. जेव्हा सैफ अली खान आणि प्रिती झिंटा अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोड पती’ शोमध्ये ‘सलाम नमस्ते’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. या शोमध्ये सारा बाबा सैफ अली खानसोबत गेली होती.

https://www.instagram.com/p/BuoaQlmAdR_/?utm_source=ig_embed

अमिताभ बच्चन साराकडे पाहून म्हणतात की, ‘सैफसोबत त्याची मुलगी साराही आली आहे… सारा तू कशी आहेस ? तू मला आदाब करशील ?’ यानंतर सारा आज्ञाधारक मुलीप्रमाणे आदाब करते. यावर अमिताभ तिला परत प्रश्न विचारतात की, ‘मला दिसतंय की, सारा तुझ्यासोबत तुझी मैत्रीणही आली आहे. कृपया सगळ्यांनी सारासाठी टाळ्या वाजवा.’

Sara-Ali--bachchan

काही दिवसापूर्वी साराचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ ‘लव्ह आज कल’ चित्रपटाच्या सीनचा होता ज्यामध्ये कार्तिक साराला किस करत होता. लवकरच कार्तिक आणि सारा इम्तियाज अलीच्या लव्ह आज कल चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे.

अरबाजच्या ‘त्या’ प्रश्नावर सनी लिओनी रडू लागली