Sara Ali Khan | सारा अली खानच्या ‘त्या’ व्हिडिओने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ; व्हिडिओ पाहताच नेटकरी संतापले

पोलीसनामा ऑनलाइन : बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. नुकताच साराने कार्तिक आर्यनसोबत पुन्हा फोटो शेअर केल्याने ती चर्चेत आली. त्यानंतर आता साराचा विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सारा खूपच कूल आणि स्टायलिश दिसत आहे. सारा (Sara Ali Khan) विमानतळावर दिसताच अनेक चाहत्यांनी तिच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती. याच दरम्यान घडलेल्या एका घटनेने सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी संताप देखील व्यक्त केला आहे.

व्हिडिओ पाहताच अनेकांनी साऱ्याचे कौतुक देखील केले आहे. कारण झालेल्या घटनेनंतर साराने अगदी शांतपणे परिस्थिती हाताळल्याने सर्वत्र तिचे कौतुक होताना दिसत आहे. सारा तिची आई अमृता सिंग बरोबर एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी चाहत्यांनी तिच्या आजूबाजूला सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यानंतर साराने देखील चाहत्यांसह फोटो क्लिक केले होते. याचवेळी एका महिलेनी तिला हात लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी साराला देखील थोडासा धक्का बसला. पण तरीही तिने या परिस्थितीशी अतिशय शांतपणे सांभाळून घेतले. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट देखील केली आहे.

व्हिडिओ शेअर होताच अनेकांनी त्या महिलेवर संताप व्यक्त केला आहे.
अशा पद्धतीने एक महिला दुसऱ्या महिलेसोबत कसे करू शकते असे प्रश्न देखील येथे उपस्थित करण्यात आले आहे.
व्हिडिओ पाहून एका युजरने कमेंट करत म्हटले की, “ही महिला साराचे (Sara Ali Khan) दागिने
हिसकावण्याचा प्रयत्न करत होती”. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले एखाद्याच्या वैयक्तिक जागेत घुसखोरी का,
शांत राहिल्याबद्दल साराचे अभिनंदन.” तर आणखीन एका युजरने म्हटले की “सारा खूपच परिपक्व आहे
आणि तिच्या आईने तिला खूपच चांगले वाढवले आहे”. सध्या साराच्या व्हिडिओने सर्वत्र धुमाकूळ माजला आहे.
सारा ही अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी आहे.

Web Title :- Sara Ali Khan | viral video sara ali khans close encounter with a touchy fan