Sara Ali Khan Viral Video | मेकअप करताना व्हॅनिटीमधील बल्ब फुटला सारा अली खानच्या चेहऱ्याजवळ, व्हिडिओ झाला व्हायरल..

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मोठ्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. आपल्या अभिनयाबरोबरच सारा फॅशन सेन्सबाबत सुद्धा सतत प्रेक्षकांच्या चर्चेत असते. मात्र अलीकडेच सारा अली खान (Sara Ali Khan Viral Video) सोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Sara Ali Khan Viral Video) झाला आहे

 

 

रविवारी सारा अली खान सोबत एक प्रचंड धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे ती तीव्र प्रमाणात घाबरली. साऱा सोबत ही घटना रविवारी सकाळी घडली होती. सकाळी ती शूटिंगसाठी तयार होत होती. मेकअप करत असताना अचानकपणे व्हॅनिटीमधील बल्ब फुटला. बल्ब एकदम अचानक फुटल्यामुळे ती भयंकर घाबरली. तसेच ही सगळी घटना साराने (Sara Ali Khan Viral Video) तिच्या इंस्टाग्रामवरील अकाउंटवर शेअर केली आहे.

 

सारानं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केलेला व्हिडिओमध्ये ती शूटिंगसाठी तयार होताना दिसत आहे.
सारा एका आरशासमोर बसलेली आहे. तर मेकअप आर्टिस्ट तिचा मेकअप करत आहेत.
तेवढ्यातच एक मोठा आवाज ऐकायला येतो, ज्यामुळे ती घाबरलेली पाहायला मिळते.
खरं तर हा बल्ब तिच्या मेकअप मिररला लावला होता. त्यामुळे तो अगदी तिच्या तोंडाजवळ फुटला.
तिनं शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये प्रकाश सुद्धा दिसत आहे, बल्ब फुटल्याचा आवाज देखील ऐकू येतोय.
परंतु तिला (Sara Ali Khan) कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.
मात्र अचानकपणे तो बल्ब तिच्या चेहऱ्या समोरच फुटल्यामुळं ही घटना तिच्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे.

 

दरम्यान, सारा (Sara Ali Khan) सध्या विकी कौशल (Vicky Kaushal) सोबत लक्ष्मण उत्तेकरचा आगामी चित्रपटसाठी इंदोर मध्ये आहे.
हा चित्रपट अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आणि कृती सेनन (Kriti sanon) च्या लुका छुपीचा (Luka Chuppi) सिक्वल असल्याचं सांगितलं जातंय. परंतु याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
परंतु या चित्रपटामध्ये सारा सोबत विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

Web Title :-  viral video shocking incident happened with actress
sara ali khan makeup mirror bulb blast on front of her face video viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे, पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या