सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाचे ‘या’ अभिनेत्री सोबत सुरु होते ‘डेटिंग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – खोडखर हसऱ्या आणि निरागस स्वभावाची देणं लाभलेली अभिनेत्री म्हणून सारा अली खान नावारूपाला आली आहे. ‘केदारनाथ’ चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला आहे. मागच्या काही दिवसात साराने  कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. एका मुलाखतीला सामोरे जाताना तिला तिच्या खाजगी आयुष्याबद्दल विचारले असता तिने खुलेपणाने आपल्या प्रेमाबद्दल सांगितले, आपले एकाच व्यक्तीवर खूप प्रेम असून त्या व्यक्तीने मला उभ्या आयुष्यात दुखावले नाही असे सारा म्हणाली होती.

फिल्म फेअरला दिलेल्या मुलाखतीत आपण काही वर्षांपूर्वी वीर पहाडियाला डेट करत होतो हे साराने मान्य केले आहे. वीर काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. सारा आणि वीर २०१६ मध्ये दोघेही एकमेकांच्या गाढ प्रेमात होते. मात्र वर्ष भराच्या आतच त्यांचे नाते संपुष्टात आले. मी उभ्या आयुष्यात एकाच व्यक्तीवर प्रेम केले आहे. तो व्यक्ती म्हणजे वीर आहे. त्याने कधीही दुखावले नाही. आयुष्याच्या एका वळणावर आम्ही नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मी सिंगल आहे असे साराने मुलाखतीत सांगितले आहे.

केदारनाथ ‘सिम्बा’ चित्रपटा पासून सारा सिनेशृष्टित आली. सध्या केदारनाथमध्ये तिच्या सोबत असणारा सुशांत सिंह राजपूत याच्या सोबत हि तिचे नाव जोडले जाते आहे. मात्र साराने या संदर्भात कोणते हि स्पष्टीकरण दिले नाही.