15 वर्षांपूर्वी ‘अशी’ दिसायची सारा अली खान, ओळखूही येत नाही ! थ्रोबॅक फोटो ‘व्हायरल’

पोलीसनामा ऑनलाईन :अनेकांना माहितीच आहे की, बॉलिवूड स्टार सारा अली खान इंडस्ट्रीत येण्याअगोदर खूप जाड होती. तिनं स्वत:ला खूप ग्रुम करता एवढा बदल घडवला आहे की, तिचा जुना फोटो पाहून क्वचितच कोणाला विश्वास बसेल की ही सारा आहे. सध्या साराचा एक थ्रोबॅक फोटो समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांना तर खरंच वाटत नाहीये की सारा आहे.

साराचा एक जुना फोटो समोर आला आहे ज्याची सोशलवर जोरादर चर्चा होताना दिसत आहे. साराचा हा फोटो 15 वर्षांपूर्वीचा आहे. काही चाहत्यांना याबाबत माहिती आहे की, स्वत:मध्ये बदल घडवण्यासाठी तिनं किती मेहनत घेतली आहे. सारानं इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच स्वत:ला खूप फिट बनवलं आहे. सध्या साराचा हा फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहे.

काही दिवसांपर्वीही सारानं तिचा एक फोटो शेअर केला होता ज्यात ती खूप जाड दिसत होती. तो व्हिडीओदेखील खूप व्हायरल झाला होता. काहींना तर तेव्हाही खरं वाटत नव्हतं की ती सारा अली खान आहे.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करत आहे. या सिनमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष असणार आहेत.

https://www.instagram.com/p/B68inF2Budj/