दुसर्‍यांदा ‘गंगा’ आरती पाहण्यासाठी पोहचली सारा आली खान, आई अमृता सिंहसोबत केली ‘पुजा’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सारा अली खान एका महिन्यातच दुसऱ्यांदा वाराणसीत गंगा आरतीसाठी आली. यावेळी त्या सारा सोबत तिची आई अभिनेत्री अमृता सिंहदेखील होती. सारा आणि आणि अमृताचे गंगा आरतीदरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

दशाश्वमेध घाटावर होणाऱ्या गंगा आरतीसाठी एका महिन्यातच सारा दुसऱ्यांदा दिसली. गंगा आरतीसाठी आल्यानंतर सारा आणि अमृता यांनी वैदिक विधींनी आई भगवतीचं पूजनही केलं. गंगा आरती झाल्यानंतर गंगा सेवा निधीचे अध्यक्ष सुशांत मिश्र यांनी मोमेंटो आणि प्रसाद देऊन मायलेकींचं स्वागतही केलं.

https://www.instagram.com/p/B9xpJ5xBvdX/

सारा सध्या चंदोली जिल्ह्यातील इलिया भागातील खरौजा गावात सिनेमाची शुटींग करत आहे. तिनं अलीकडेच अमोघ नारायण सिंह यांच्या बंगल्यात सिनेमाची शुटींग केली. या गावातील हवेलीतही तिनं सीन्स शुट केले आहेत. आनंद एल रायच्या या सिनेमात सारा अली खान सोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुषही काम करत आहेत.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन असणार आहे. याशिवाय सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करत आहे. सध्या सिनेमाची शुटींग सुरू आहे.