ड्रग्ज प्रकरणातील चौकशीनंतर साराची सोशल मीडियावर पहिली पोस्ट, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) ड्रग्स (drugs) प्रकरणात सारा अली खानचे (sara ali khan) नाव आल्यापासून ती सोशल मीडिपासून (social media) दूर गेली होती. साराने शेवटची पोस्ट 10 सप्टेंबरला इन्स्टाग्रामवर केली होती. त्यानंतर ती गायब झाली होती. गेल्या महिन्यात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी साराची चौकशी (investigation) केली होती. साराला जेव्हा एनसीबीकडून (NCB) समन्स पाठवण्यात आले त्यावेळी ती आई अमृता सिंग (Amruta singh) आणि भाऊ इब्राहिमसोबत गोव्यात (Goa) होती. त्यानंतर ती मुंबईत (Mumbai) आली.

View this post on Instagram

Monday Morning Mood 👀🐚🌊

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

चौकशीनंतर साराचा पहिला मेसेज
लॉकडाऊनमध्ये सारा सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह होती. मात्र ड्रग्स प्रकरणात तिचे नाव आल्यानंतर ती ना इन्स्टाग्रामवर ना ट्विटरवर कुठेच सक्रीय दिसली नाही. NCB च्या चौकशीनंतर तीने एकही पोस्ट सोशल मीडियावर केली नाही. जवळपास एक महिन्यानंतर सारा पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. साराचे तिच्या फॅन्सना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. साराने आपला फोटो पोस्ट करत लिहिले, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

वरुण धवन आणि सारा खानचा कॉमेडी ड्रामा ‘कुली नंबर 1’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हा सिनेमा ॲमेझॉन प्राईमवर 25 डिसेंबरला रिलीज होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सारा अली खान वरुण धवनसोबत ‘कुली नंबर 1’ चे प्रमोशन करणार नाही आहे.

You might also like