Sara Tendulkar | सारा तेंडूलकर आणि शुभमन गिलने गुपचुप उरकलं लग्न?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. साराचा सोशल मीडियावर चाहता वर्ग सुद्धा खुप मोठा आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. क्रिकेटर शुभमन गिल (Cricketer Shubman Gill) आणि सारा तेंडुलकरचे (Sara Tendulkar) अफेअर असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. मात्र, आता सारा आणि शुभमनबाबत एक वेगळीच माहिती समोर आल्याने दोघांच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

 

सध्या, एक बातमी व्हायरल होत असून सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) क्रिकेटर शुभमन गिलची पत्नी (Shubman Gill’s wife) असल्याची चर्चा आहे. ही चर्चा गुगलमुळे सुरू झाली आहे. कारण गुगलनेच ही माहिती लोकांसमोर आणली आहे.

 

कारण गुगल सर्चमध्ये शुभमन गिल असे टाईप केल्यास पुढे सजेशन म्हणून शुभमन गिल वाईफ असा उल्लेख येतो. जे ओपन केल्यानंतर त्याच्या बायकोचे नाव म्हणून सारा तेंडूलकरचे नाव येत आहे. परंतु ही एक अफवा आहे.

 

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करतात.
हे दोघे एकमेकांच्या फोटोंवर कमेंटही करतात. यामुळे दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे,
असा अंदाज लोकांनी वर्तवण्यास सुरूवात केल्याने त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली.
सारा आणि शुभमन एकमेकांना डेट करतात अशीही अफवा आहे.
आता गुगलवर जी माहिती दिली जात आहे ती सुद्धा केवळ अफवाच आहे.

 

Web Title :- Sara Tendulkar | sachin tendulkar daughter sara tendulkar and cricketer shubman gill got married news viral becuse of google search it showing sara is wife of shubman gill fact check

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gulabrao Patil | ‘आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात’, गुलाबरावांची संजय राऊतांवर घणाघाती टीका

 

CM Eknath Shinde | विधान परिषद निवडणुकीदरम्यान असं काय घडलं? आमदार सोबत कसे आले? – एकनाथ शिंदे

 

Monsoon Health Tips | मान्सूला झाली सुरुवात, चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी, बिघडू शकते तब्येत